UP Crime News esakal
देश

Crime News : बांदामध्ये दलित महिलेवर सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टमध्ये घातली दारुची..

महिला पतीसोबत दुचाकीवरून सासरच्या घरी जात होती.

सकाळ डिजिटल टीम

महिलेला तिच्या आईनं गावातील दोन तरुणांसह बाईकवरून तिच्या सासरच्या घरी पाठवलं आणि त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केलं.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील (Uttar Pradesh Banda) देहत कोतवालीमधील गुरेह गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा तीन तरुणांनी एका दलित महिलेवर (Dalit Women) बलात्कार केला.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) महिलेला पोलिस ठाण्यात नेलं, तिथं तिची चौकशी करण्यात आली. सामूहिक बलात्काराची ही घटना ऐकून पोलिसही चक्रावले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ती पतीसोबत दुचाकीवरून सासरच्या घरी जात होती. गुरेह गावाजवळ पतीच्या तीन मित्रांनी त्यांना रस्त्यात अडवलं. यावेळी पती दारूच्या नशेत होता, त्याचा फायदा घेत त्यांच्या मित्रांनी पतीला दुकानातून सिगारेट घेण्यासाठी पाठवलं.

यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला, तर तिसर्‍यानं विरोध केल्यामुळं बलात्कार करण्यात अयशस्वी झाल्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बाटली घातली. रात्री उशिरा गँगरेपची बातमी मिळताच, सीओ सिटी अंबुजा त्रिवेदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेची विचारपूस केली.

कोतवालीचे प्रभारी अखिलेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिच्या आईनं गावातील दोन तरुणांसह बाईकवरून तिच्या सासरच्या घरी पाठवलं आणि त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळ गाठलं. महिला आणि तिच्या आईच्या जबानीत तफावत असल्यामुळं पोलीस घटनेची सत्यता जाणून घेण्यात व्यस्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Citizenship Proof : पॅनकार्ड,मतदार ओळखपत्र म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Madhya Pradesh Tribal Development : प्रत्येक गावात डिजिटल लायब्ररी, बैगा समाजासाठी आरोग्य-पोषण एक्स्प्रेस; आदिवासी विकासाचा विशेष आराखडा

आजचे राशिभविष्य - ११ नोव्हेंबर २०२६

Jharkhand Government Jobs : झारखंडमध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या १,०३८ जागांसाठी भरती; दरमहा २५ हजार रुपये मानधन

Uttar Pradesh HIV Data : उत्तर प्रदेशात १.७४ लाख एचआयव्ही बाधित; कारागृहांमधील ५८७ कैद्यांचाही समावेश, ५३ एआरटी केंद्रांद्वारे मोफत उपचार

SCROLL FOR NEXT