mother died between marriage Barat 
देश

मुलाच्या वरातीत नाचत असतानाच तोल गेला... आणि आईचा मृत्यू

आईला आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता, असे कुटूंबियांनी सांगितले

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात लग्नाची मिरवणूक सुरू असताना अचानक गोंधळ माजला. त्याला कारणंही तसेच घडले. नवऱ्याची आई मुलाबरोबर नाचत असताना अचानक कोसळून तिचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर(Social Media) या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओत दिसते की, एक आई आपल्या मुलाच्या लग्नाच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक कोसळली. (Viral Video)

नवऱ्या मुलाचे नाव नीरज असून त्याच्या आईचे नाव निलम आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे. ही घटना ३ फेब्रुवारीला घडली. नीरज लग्नाची मिरवणूक चिकणी येथील घरातून अलवर जिल्ह्यातील किशनगड बास येथे निघाली होती. वाटेत नाचण्यासाठी डिजे चालू होता. त्या डिजेवर नीलम यांनी मुलाबरोबर २० सेकंद डान्स केला. त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. तेव्हा नीरज आपल्या आईला पकडण्यासाठी धावला. कुटुंबियांनी त्यांना ताबडतोब रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता, असे कुटूंबियांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा, ७०० कंपन्या फक्त कागदावर, अब्जावधींची कमाई; EDचा दावा

IPL Mock Auction : ३०.५० कोटी! कॅमेरून ग्रीन ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू... CSK vs KKR मध्ये कोणी मारली बाजी?

इन्स्टाग्रामवर ओळख अन् प्रेमातून रक्तरंजित शेवट; पतीला सोडून पळून गेलेल्या विवाहित महिलेची निर्घृण हत्या, गुप्तांगात आढळले कापडाचे तुकडे

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या ३ हजार ६२ कोटींच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सिरियातून आलेला तरुण ऑस्ट्रेलियात झाला हिरो; सिडनी हल्यात दहशतवाद्यांची बंदूक हिसकवणारा अहमद कोण?

SCROLL FOR NEXT