spicejet 
देश

हवेत घडला थरार! प्रवाशाकडून विमानाचा इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

हवेत झेपावलेल्या विमानातील एका प्रवाशाने इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना होता होता टळली. नवी दिल्लीहून वाराणसीला निघालेल्या स्पाईसजेटच्या विमानात हा थरारक प्रकार घडला. हे धोकादायक कृत्य करणाऱ्या प्रवाशाला केबिन क्रूने तात्काळ पकडले आणि विमान सुरक्षितरित्या लँड झाल्यानंतर त्याला वाराणसी पोलिसांच्या ताब्यात दिले. 

पंतप्रधान मोदींच्या हस्ताक्षराची चर्चा; सोशल मीडियावर धुमाकूळ

या घटेनेबाबत सविस्तर माहिती देताना स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितलं, "वाराणसीकडे जाणाऱ्या आमच्या विमानात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. गौरव नावाचा एक प्रवासी अचानक आपल्या जागेवरुन उठून उभा राहिला तसेच तडक विमानाच्या इमर्जन्सी डोअरकडे जात त्यानं हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, जेव्हा विमान आधीच हवेत झेपावलं होतं. हे पाहताच एका महिला क्रूने तात्काळ त्या प्रवाशाला इतर प्रवाशांच्या मदतीनं रोखलं आणि विमान वाराणसी विमानतळावर लँड होईपर्यंत पकडून ठेवलं. या घटनेची माहिती विमानातील क्रू मेंबर्सनी कॅप्टनला दिली. त्यानंतर कॅप्टनने एअर ट्रॅफिक कन्ट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाच्या प्रायोरिटी लँडिंगसाठी विनंती केली. त्यानंतर जेव्हा विमान वाराणसी विमानतळावर सुरक्षितरित्या लँड झालं तेव्हा संबंधित प्रवाशाला CISFचे जवान आणि स्पाईसजेटच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने स्थानिक पोलिसांच्या हवाली करण्यात आलं."

हवाई दलाची वाढणार ताकद; महिन्याभरात १० राफेल विमानांचं होणार आगमन

सुत्रांच्या माहितीनुसार, विमानाचं इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी 1C या जागी बसला होता. तसेच विमानाने उड्डाण केल्यानंतर तो विमानात इकडे तिकडे फिरतही होता दरम्यान त्यानं अचानक एक्झिट डोअर उघडण्याचा प्रयत्न केला. 

'नो फ्लाय लिस्ट'मध्ये समावेश

या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती स्पाईसजेटने डीजीसीएला कळवली आहे. तसेच या गंभीर घटनेनंतर संबंधीत प्रवाशाचा समावेश स्पाईसजेटने 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT