Dantewada Naxal Attack 
देश

Dantewada Naxal Attack : छत्तीसगडमध्ये ११ जवान शहीद, नेमकं काय घडल ? वाचा...

Dantewada Naxal Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. लष्कराच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे.

Sandip Kapde

दंतेवाडा (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. लष्कराच्या वाहनावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्यात ११ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सैनिकांचे वाहन उडवल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या वाहनात जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवान बसल हते.

या घटनेत ११ जवान शहीद झाल्याची बातमीही समोर आली आहे. या संपूर्ण घटनेत जवानांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नक्षलवादीही मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदाक चकमक देखील झाली.

दरम्यान याठीकाणी जवानांचा फौजफाटा रवाना करण्यात आला आहे. यासोबतच वैद्यकीय सुविधा देण्यासाठी दोन रुग्णवाहिकाही देखील रवाना करण्यात आल्या आहेत. ही घटना दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. (Marathi Tajya Batmya)

मोहीमेवरुन परतत असलेल्या जवानांवर हल्ला झाला

asianet news च्या माहितीनुसार दंतेवाडा परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यामुळे डीआरजी टीम शोध मोहिमेसाठी रवाना झाली होती. शोध मोहीम पूर्ण करून हे पथक परतत असताना नक्षलवाद्यांनी परतीच्या मार्गावर आयईडी टाकून स्फोट केला. या हल्ल्यात १० जवानांसह १ चालकाचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

भारतीय जवानांवरील नक्षलवादी हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य समोर आले आहे. भूपेश बघेल म्हणाले, "शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा शेवटच्या टप्प्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू"

गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

Pimpri News : फुगेवाडीत सलग मृत्यूंनी खळबळ; हातभट्टी दारूची चर्चा, पोलिसांचा इन्कार

SCROLL FOR NEXT