darjeelings padmaja naidu himalayan zoological park recognised best in india sakal
देश

Padmaja Naidu Himalayan Zoo : दार्जिलिंगचे पद्मजा नायडू प्राणीसंग्रहालय सर्वोत्तम

मानांकने जाहीर; चेन्नईला दुसरे तर, म्हैसूरला तिसरे स्थान

सकाळ वृत्तसेवा

दार्जिलिंग : पश्‍चिम बंगालच्या दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयीन प्राणीसंग्राहलय हे देशातील सर्वोत्तम प्राणिसंग्रहालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. कोलकत्याच्या अलीपूर येथील प्राणीसंग्राहलयास चौथे स्थान मिळाले आहे. भुवनेश्‍वर येथे दहा सप्टेंबर रोजी प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांची परिषद आयोजित केली होती. यावेळी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील प्राणिसंग्रहालयाची रॅकिंग जाहीर केली. देशात सुमारे दीडशे प्राणिसंग्रहालय आहेत. यानुसार चेन्नईचे अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयाचे दुसरे स्थान मिळवले.

तर कर्नाटकच्या म्हैसूर येथील श्री चामराजेंद्र झुओलॉजिकल गार्डनने तिसरा क्रमांक पटकावला. दार्जिलिंगच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक बसवराज होलेयाची यांनी आनंद व्यक्त केला असून या यशाचे श्रेय प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांकडे जाते, असे म्हटले आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या प्राधिकरणाने व्यवस्थापन आणि सुविधा यासारख्या विविध निकषांवर देशभरातील प्राणिसंग्रहालयाचे मूल्यमापन केले. दार्जिलिंगच्या प्राणीसंग्राहालयास ८३ टक्के गुण मिळाल्याचे संचालकांनी सांगितले.

रँकिग कशी दिली जाते

मंत्रालयाकडून केलेल्या सर्वेक्षणात सहा वेगवेगळ्या निकषावर रॅकिंग दिली जाते. यात साफसफाई, पर्यटकांना दिली जाणारी सुविधा, प्राण्यांच्या खाद्यपदार्थाचा दर्जा, अधिवासाची सुविधा आदींचा समावेश आहे. पंधरा तज्ज्ञांच्या समितीने या निकषाच्या आधारावर रॅकिंग प्रदान केली. देशात एकूण १४७ मान्यताप्राप्त प्राणिसंग्रहालय आहेत. यात मोठे, मध्यम आणि लहान स्वरूपाच्या प्राणीसंग्राहालयाचा समावेश आहे.

दार्जिलिंग झुओलॉजिकल पार्क

दार्जिलिंग झुओलॉजिकल पार्कची स्थापना १४ ऑगस्ट १९५८ मध्ये झाली. हिमालयात दुर्मीळ असलेल्या हिमबिबट्या आणि लाल पांडा या प्रजातींचे प्रजनन आणि संवर्धनासाठी दार्जिलिंगचे प्राणिसंग्रहालय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते.

अरिग्नर अण्णा झुओलॉजिकल पार्क

चेन्नईतील प्राणिसंग्रहालय देशातील सर्वात मोठ्या संग्रहालयापैकी एक आहे. हे प्राणिसंग्रहालय १३०० एकरावर असून यात प्राणी आणि पक्षी मिळून एकूण १५०० वेगवेगळ्या प्रजाती आहेत. या ठिकाणी अडीच हजारापेक्षा विविध झाडांचे प्रकार आहेत. पूर्वी मद्रास झू नावाने हे प्राणिसंग्रहालय ओळखले जायचे.

श्री चामराजेंद्र झुओलॉजिकल गार्डन

म्हैसूरचे जगप्रसिद्ध श्री चामराजेंद्र झुओलॉजिकल गार्डनमध्ये देश विदेशातील पशू पक्षी पाहावयास मिळतील. पांढरा हत्ती आणि पांढरा मोर यासारखे प्राणीही पर्यटकांना आकर्षित करतात. या प्राणीसंग्राहालयाजवळचे करंजी सरोवरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT