Rape Sakal
देश

Jharkhand Crime l फिरायला नेण्याचा बहाणा करत दिरानेच केला वहिणीवर बलात्कार

झालेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

सकाळ डिजिटल टीम

झारखंड: फिरावला नेण्याचा बहाणा करून आपल्याला वहिनीवरच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. झारखंडमधील रांची (Jharkhand-Ranchi) येथील महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला असून, याबाबात पोलिसात पिडीत महिलेने तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिरायला नेण्याचा बहाणा करून पिडीत महिलेला तिच्या दिराने पाटणा आणि दिल्लीला (Delhi)घेऊन गेला. दिल्लीत त्याने एका भाड्याच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या महिलेला कोलकात्याताला घेवून गेला. झालेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने रांची रेल्वे स्थानकावर तिला सोडून पळून गेला.

पिडितेच्या म्हणण्यानुसार, संशियताचे तिच्या घरी येणे-जाणे होते. २८ मार्च रोजी संशियताने तीन वाजता भेटायला बोलावले. त्याने टॅक्सी बुक केली आणि फिरायला जाऊया असे सांगून घेवून गेला. पिडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत फिरायला गेली. मात्र काही अंतर गेल्यावर गाडीतून उतरवून बसमध्ये बसवले आणि नंतर पाटण्याला गेले. पाटण्याहून ट्रेनने दिल्लीला आणले. येथे त्याने भाड्याचे घर घेतले. त्याठिकाणी त्याने दोन दिवस तिच्यावर बलात्कार केला.

याचबरोबर दोन दिवस कोलकाता (Kolkata) हॉटेलमध्ये डांबून तिच्यावर बलात्कार केला. तिने घरी जाण्याचा हट्ट केल्यावर ४ एप्रिलला तिला ट्रेनने रांचीला नेले. रांची स्टेशनवर पोहचताच त्याने संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने पीडितेला रांची रेल्वे स्टेशनवर सोडून पळ काढला. पिडिता महिला घरी पोहोचताच तिने पतीला घटनेची संपूर्ण माहिती दिली. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT