Vaccination to Children Sakal
देश

Corbevax: लहान मुलांसाठी लवकरच येणार आणखी एक लस

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बायोलॉजीकल ई या कंपनीची Corbevax ही लस RBD प्रोटीन सब यूनिटची ही लस दोन डोसची असणार आहे.

सुधीर काकडे

कोरोना (Covid19) विरुद्धच्या लढाईमध्ये भारताला लवकरच आणखी एक लस मिळणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) हैदराबादच्या बायोलॉजिकल ई लिमीटेड या कंपनीला 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठीच्या कोरोना लसीसाठी क्लीनीकल ट्रायल घेण्याची परवानगी दिली आहे. अटी आणि शर्थींसह डीसीजीआयने Corbevax या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लीनीकल ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार वेगवेगळ्या 10 ठिकाणी या लसीची क्लिनिकल ट्रायल होणार आहे. तज्ञांच्या समितीच्या शिफारशीनंतर या लसीच्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बायोलॉजिकल कंपनी तयार करत असलेली RBD प्रोटीन सब यूनिटची ही लस आहे. Corbevax चे दोन डोस असणार आहेत. DCGI ने 5 ते 18 वर्षांच्या मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलला परवानगी दिली असल्याने, आता कोरोना विरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार असल्याची शक्यता आहे. Corbevax लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच ही लस सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बजारात येईल अंदाज वर्तवण्यात आला होता. तर भारत बायोटेकच्या ते 18 वर्ष वयोगटातील Covaxinच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा अभ्यास सुरु आहे. DCGIने जुलैमध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला 2 ते 17 वर्षे वयोगटासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास परवानगी दिली.

दरम्यान, झायकोव्ह-डी (Zycov-d) ही कोरोनाची स्वदेशी लस देखील लवकरच येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही लस बाजारात उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. झायडस कॅडीलाची जायकोव-डी ही जगातील पहिली लस प्लाज्मिड डीएनएवर (Plasmid DNA) आधारित लस आहे. 12 ते 17 वर्षांच्या बालकांसाठी भारताने मंजूर केलेली एकमात्र लस आहे. झायडस ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर शर्विल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीची किंमत तंत्रज्ञान, क्षमता आणि आकारावरून ठरवली जाईल. तसेच इतर लसींपेक्षा या लसीची किंमत कमी असण्याची शक्यता आहे. वर्षभरात तब्बल 10 ते 12 करोड डोस तयार कण्याचा झायडस कॅडिलाचा प्रयत्न असल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT