House sakal
देश

फक्त आठ लाखांत खरेदी करा स्वप्नातील घर! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही तुमचे दिल्लीत घर घेण्याचे स्वप्न फक्त आठ लाख रुपयात पूर्ण करू शकता.

सकाऴ वृत्तसेवा

तुम्ही तुमचे दिल्लीत घर घेण्याचे स्वप्न फक्त आठ लाख रुपयात पूर्ण करू शकता.

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) स्वतःचे घर (House) घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना डीडीएने (DDA)नवीन वर्षाची खुशखबर दिली आहे. तुम्ही तुमचे दिल्लीत घर घेण्याचे स्वप्न फक्त आठ लाख रुपयात पूर्ण करू शकता. यावेळी डीडीएने 15,500 फ्लॅटसाठी स्कीम लॉन्च केली आहे.

सबसीडीचा लाभही मिळेल

महागाईचा सामना करणार्‍या सर्वसामान्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे तुमचा फ्लॅट (Flat)लकी ड्रॉमध्ये (डीडीए लकी ड्रॉ) निघाला तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमधून (PM awas yojana) सबसीडीचा लाभही मिळेल. या योजनेत, DDA ने HIG, MIG, LIG ​​आणि जनता फ्लॅट या चार श्रेणींसाठी ड्रॉ काढले आहेत. त्यासाठी 23 डिसेंबरपासून निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील दोन महिने ही निविदा खुली राहणार आहे. 7 फेब्रुवारी ही बोली लावण्याची शेवटची तारीख आहे.

या ठिकाणी हे फ्लॅट बांधले आहेत

DDA चे हे फ्लॅट द्वारका, नरेला, रोहिणी, जसोला, पश्चिम विहार आणि वसंत कुंज येथे आहेत. यावेळी चारही श्रेणींमध्ये एकूण 15,500 फ्लॅट उपलब्ध आहेत. यावेळी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली जात आहे. DDA च्या अधिकृत वेबसाइट dda.gov.in वर नोंदणी करता येईल. ज्या ग्राहकांची ड्रॉ काढले जाईल त्यांना ताबा (पजेशन) घेण्यासाठी फक्त डीडीए कार्यालयात जावे लागेल.

सर्व प्रक्रिया ऑनलाइन

अर्जाशी संबंधित अटी व शर्तींची माहिती डीडीएच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. फ्लॅटची किंमत आणि बजेटनुसार तुम्ही अर्जही करू शकता. अर्जदाराला नाव, मोबाईल नंबर, पत्ता यासह इतर आवश्यक माहिती द्यावी लागेल. त्यानंतर अर्जदाराचे खाते उघडले जाईल आणि तो या योजनेत अर्ज करू शकेल.

इतकी ठेवण्यात आली आहे बुकिंगची रक्कम

एचआयजी आणि एमआयजी श्रेणींसाठी बुकिंग रक्कम प्रत्येकी 2 लाख रुपये आहे. एलआयजीसाठी ही रक्कम एक लाख रुपये आहे, तर जनता फ्लॅटसाठी 25 हजार रुपये आहे. याशिवाय सर्व श्रेणींसाठी प्रक्रिया शुल्क (प्रोसेसिंग फी) दोन हजार रुपये आहे. जनता फ्लॅटची किंमत 7.91 लाख ते 30 लाख रुपये आहे.

याप्रमाणे अर्ज करा

- सुरवातीला DDA वेबसाइटला भेट द्या.

- येथे DDA स्पेशल हाउसिंग स्कीम 2021 होमपेजवरच दिसेल, त्यावर क्लिक करा.

- आता रजिस्ट्रेशनला सिलेक्ट करा

- एक नवीन पेज उघडेल. येथे पॅन, आधार, मोबाईल नंबर अशी माहिती द्या.

- माहिती सबमिट केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल.

- आता तुमचे अकाउंट तयार झाले आहे. पॅन नंबर आणि ओटीपीच्या मदतीने तुम्ही कधीही लॉग इन करू शकता.

- लॉगिन केल्यानंतर, डीडीएचा अर्ज भरा.

- तुमचा स्कॅन केलेला फोटो आणि सही अपलोड करा.

- सर्व गोष्टी सबमिट केल्यानंतर पेमेंटचा ऑप्शन येईल.

- अर्जदार एनईएफटी/आरटीजीएस किंवा ई-चलानच्या मदतीने ऑनलाइन पेमेंट करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''आम्ही उघडपणे वाल्मिकअण्णांचं समर्थन करतो, त्यात चुकीचं काहीही नाही'', बॅनर झळकलेला संदीप तांदळे नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत सर्पदंश मृत्यू प्रकरणावर संतप्त नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर

Viral: 'ये हिरो डोक्याची गोळी घे पण ऑफिसला ये' बॉस आणि कर्मचाऱ्याचं चॅट व्हायरल, म्हटला...'काही झालं तरी...'

ICC च्या मोठ्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा; स्मृती मानधनालाही नामांकन

LAL KITAB PREDICTION 2025 : राहूमुळे तुमची शांतता होणार भंग ! 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, जाणून घ्या मासिक राशिभविष्य

SCROLL FOR NEXT