Farooq Ahmad Mir esakal
देश

जम्मू-काश्मीरात आता पोलिस उपनिरीक्षकाची हत्या; दहशतवाद्यांनी अपहरणानंतर केलं ठार

सकाळ डिजिटल टीम

सध्या स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जम्मू-काश्मीर पोलीस दलातील (Jammu and Kashmir Police) एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह भातशेतीत पडलेला आढळून आल्यानं एकच खळबळ उडालीय. दहशतवाद्यांनी (Terrorists) ही घटना घडवून आणल्याचं मानलं जात आहे. मृतदेह पाहिल्यानंतर एसआयचे अपहरण करून निर्जनस्थळी नेण्यात आलं, त्यानंतर गोळ्या झाडून मृतदेह फेकून दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मृत एसआयचं नाव फारुख अहमद मीर (Farooq Ahmad Mir) रा. सांबुरा पंपोर असं आहे. पोलिसांनी सांगितलं की, एसआयचा मृतदेह सांबुरा येथील भाताच्या शेतात पडलेला आढळला. फारुख सध्या लेथपोरा इथं 23 Bn IRP मध्ये OSI म्हणून तैनात होते.

दोन दिवसांपूर्वी अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडनं हल्ला केला होता. यामध्ये एक तरुण जखमी झाला. ही घटना पडशाही बाग परिसरातील आहे. अहमदउल्ला असं जखमी पोलिसाचं नाव असून तो हेड कॉन्स्टेबल होता. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांसाठी दहशतवादी हे नवं आव्हान बनलंय. गेल्या 2 महिन्यांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या 6 घटना घडल्या. दहशतवाद्यांचा हा नवा मार्ग असून बहुतांश सदस्य लष्कर-ए-तौयबाशी (Lashkar-e-Taiba) संबंधित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

CIBIL Score: तुमचा CIBIL आताच सुधारा, जर तुमचा सिबिल खराब असेल तर नोकरीही मिळणार नाही

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

SCROLL FOR NEXT