Accident News  esakal
देश

Accident News : रात्रीच्या अंधारात काळाचा घाला! भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिहारमध्ये भीषण अपघाताची माहीती समोर आली आहे. बिहारच्या (Bihar) अवरल याठिकाणी ट्रक आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना घडताच परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी) रात्री राष्ट्रीय महामार्ग 139 वरती हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. ट्रक आणि रिक्षा दोन्हीही औरंगाबादच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी पुढे असलेल्या रिक्षामध्ये ५ जण प्रवास करत होते. मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा काही अंतरावर फेकली गेली.

अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचे वरचे छत वेगळे झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृत व्यक्तींची ओळख अद्याप पूर्ण पटली नसून ते जगदीशपुर आरा येथील रहिवासी असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

या भीषण अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तब्बल तासभर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी यावेळी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT