train accident
train accident train accident
देश

Video Reel : लाईक्स, कमेंट्सच्या चक्करमध्ये गेला चार मित्रांचा जीव

सकाळ डिजिटल टीम

फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हिडिओ रील टाकून लोकांच्या लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याच्या हव्यासापोटी चार मित्रांचा मृत्यू (Death of four 4 friends) झाला. मित्रांसोबत फिरायला घराबाहेर पडलेल्या चार तरुणांचा मंगळवारी सायंकाळी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. चारही तरुण बराच वेळ रेल्वे रुळावर होते. एकमेकांचे फोटो काढून व्हिडिओ बनवत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ट्रेन आल्यानंतरही तरुण रुळावरून न हटल्याने त्यांचा मृत्यू (Train Accident) झाला.

जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसई-धनकोट रेल्वे स्थानकाजवळ हे चार तरुण मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होते. घटनेनंतर शेजारी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी जीआरपी अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. मुले घरी न पोहोचल्याने समीरच्या वडिलांनी टीव्हीवर घटनेची बातमी पाहून जीआरपी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आणि घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पडलेल्या मृतदेहावरून त्यांनी मुलाची ओळख पटवली. मुलाचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

दोन मृतांची (Train Accident) ओळख पटली आहे. देवीलाल कॉलनीत राहणारे १८ वर्षीय समीर आणि १६ वर्षीय अनस अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही मित्र एकाच कॉलनीतील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी एकमेकांशी बोलून ते घराबाहेर पडले होते. मात्र, ते कुठे जात आहे हे कुटुंबीयांना सांगितले नाही. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मित्र घरी न पोहोचल्याने शोधाशोध सुरू झाली.

फॉरेन्सिक तपासणीसाठी फोन पाठवले जातील

घटनास्थळाजवळ जीआरपी पोलिसांच्या पथकाला तुटलेल्या अवस्थेत मोबाईल (Mobile) सापडले. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतले आहे. फोन कार्यरत नसल्यामुळे जीआरपी हे फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार आहे. याद्वारे घटनेपूर्वीच्या फोनमध्ये तरुणांचा फोटो किंवा व्हिडिओ आहे का, याची माहिती मिळणार आहे.

घटनेची माहिती मिळताच टीम घटनास्थळी पोहोचली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आले आहेत. दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. हे एकाच शेजारी राहणारे मित्र होते. इतर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी काही लोक शवागारात पोहोचले आहेत, असे जीआरपी स्टेशन प्रभारी रामफळ यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Gautam Gambhir: हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या डिविलियर्सवर भडकला गंभीर; म्हणाला, 'त्यांच्या कारकि‍र्दीत...'

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

IPL 2024 DC vs LSG Live Score: लखनौ - दिल्लीमध्ये अटीतटीचा सामना! केएल राहुलने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT