whiskey 
देश

बनावट दारु विक्री केल्यास फाशीची शिक्षा; मध्य प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

बेकायदा आणि बनावट दारुची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा आणण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : बेकायदा आणि बनावट दारु विक्री (Fake liquor sale) करणाऱ्यांना आता जन्माची अद्दल घडवण्याची योजना मध्य प्रदेश सरकारने (MP Govt) आखली आहे. यानुसार, अशा प्रकारे बनावट दारु विक्री करणाऱ्यांविरोधातील दहा वर्षांच्या शिक्षेत वाढ करत आता जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षा (death penalty) होणार आहे, यासंबंधीच्या प्रस्तावाला मंगळवारी शिवराजसिंह चौहान सरकारनं मंजुरी दिली.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या बैठकीत या संबंधीच्या दुरुस्ती विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. यानुसार, बनावट अर्थात विषारी दारु प्यायल्यामुळे मृत्यू झाल्यास आरोपीला जन्मठेपेपासून फाशीपर्यंतची कडक शिक्षा होऊ शकते. तसेच दंडाची रक्कम २५ लाख रुपये करण्यात आली आहे.

तसेच बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर किंवा इतर चौकशी पथकावर हल्ला केल्यास तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

कुठल्या परिस्थितीत होणार जन्मठेप आणि फाशीची शिक्षा

जर बनावट दारु प्यायल्याने कोणाचा मृत्यू झाला तर पहिल्यांदा आरोपीला १० वर्षांच्या तुरुंगवासासह जन्मठेपेची शिक्षा होऊ शकेल. दुसऱ्यांदा किंवा पुन्हा हा गुन्हा केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकेल. तसेच दारुमध्ये भेसळ केल्याप्रकरणी ३० हजार रुपयांचा दंड वाढवून तो दोन लाख रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी दारुमध्ये भेसळ केल्यास ३०० रुपयांपासून २,००० रुपयांचा किरकोळ दंड आकारण्यात येत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT