Narayan Rane, Bharati Pawar, Bhagavat Karad, Kapil Patil
Narayan Rane, Bharati Pawar, Bhagavat Karad, Kapil Patil 
देश

ठरलं! राज्यातील 'हे' चार नेते घेणार मोदी कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची शपथ

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मोदी कॅबिनेटचा विस्तार आणि फेरबदल होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. त्यासाठी सकाळपासूनच सध्याच्या कॅबिनेटमधील अनेक नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यानंतर आता कॅबिनेटमध्ये समावेश असणाऱ्या ४३ मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश आहे.

मोदींच्या कॅबिनेटमध्ये समावेश होणाऱ्या राज्यातील चार नेत्यांमध्ये नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांचा समावेश आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या ४३ नेत्यांच्या नावाची यादी एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली आहे.

मोदी कॅबिनेटमध्ये समावेश होणारे देशातील महत्वाचे नेते

केंद्रीय मंत्रिमंडळात देशभरातील ४३ नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये महत्वाची नावं म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे, पशुपतीकुमार पारस, भुपेंद्र यादव, अनुप्रिया पटेल, मिनाक्षी लेखी, अजय भट्ट, अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे.

अशी आहे मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ४३ नेत्यांची यादी

नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य शिंदे, रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपतीकुमार पारस, किरेन रिजिजू, राजकुमार सिंह, हरदीपसिंह पुरी, मनसुख मांडवीय, भूपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, कृष्णन रेड्डी, अनुरागसिंह ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया सिंह पटेल, सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंदजाले, भानुप्रताप सिंह वर्मा, दर्शना जर्दोश, मिनाक्षी लेखी, अन्नपुर्णा देवी, ए. नारायणस्वामी, कुशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवसिंह, भागवत खुबा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, भागवत कराड, राजकुमार रंजन सिंह, भारती पवार, बिसवेश्वर टुडू, शंतनू ठाकूर, मुंजपरा महेंद्रभाई, जॉन बरला, एल. मुरुगन, निसिथ प्रामाणिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT