‘Dunagiri’ sakal
देश

स्वदेशी बनावटीची 'दुनागिरी' युद्धनौका नौदलात दाखल; भारताची ताकद वाढली

उत्तराखंडमधील एका शिखराच्या नावावर असलेली ही युद्धनौका गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्सने बनवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : भारताची स्वदेशी बनावटीची दुनागिरी (INS Dunagiri) युद्धनौका नौदलाकडे सुपुर्द करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या हस्ते याचे हुगळी नदीत INS दुनागिरी लाँच करण्यात आले. उत्तराखंडमधील एका शिखराच्या नावावर असलेली ही युद्धनौका गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स म्हणजेच कोलकाता येथील जीआरएसई शिपयार्डने बनवली आहे. भारतीय नौदलात (Indian Navy) ही युद्धनौका दाखल झाल्यामुळे भारताची समुद्रातील ताकद वाढली आहे. दुनागिरी या युद्धनौकेतील 75 टक्के शस्त्रे, उपकरणे आणि यंत्रणा स्वदेशी युद्धनौकेची रचना नौदलाच्या नौदल संचालनालयाने तयार केली आहे. (INS Dunagiri Warship News In Marathi)

INS दूनागिरी ही प्रोजेक्ट-17A ची चौथी युद्धनौका आहे जी आज लॉन्च करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत नौदलासाठी एकूण सात शिवालिक क्लास फ्रिगेट्स बांधण्यात येणार आहेत. यापैकी चार मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे तर उर्वरित तीन जीआरएसई येथे बांधण्यात येत आहेत. माझगाव डॉकयार्डने यापूर्वीच या वर्गाच्या दोन युद्धनौका समुद्रात लॉन्च केल्या आहेत. या श्रेणीची तिसरी युद्धनौका उदयगिरी गेल्या महिन्यातच नौदलात दाखल झाली आहे. त्यानंतर जीआरएसईची ही दुसरी युद्धनौका आहे. या सातही युद्धनौकांना देशातील विविध पर्वतांच्या नावावरुन नावे देण्यात आली आहेत. दुनागिरी या युद्धनौकेतील 75 टक्के शस्त्रे, उपकरणे आणि यंत्रणा स्वदेशी असून, या सर्व युद्धनौकांची रचना नौदलाच्या नौदल संचालनालयाने तयार केली आहे.

INS दुनागिरीची वैशिष्ट्ये

दुनागिरीसह प्रोजेक्ट 17A ची सर्व फ्रिगेट्स शिवालिक क्लास (प्रोजेक्ट-17) युद्धनौकांसाठी फॉलो-ऑन आहेत. शिवाय सर्वांमध्ये यापूर्वीच्या तुलनेत उत्तम स्टेल्थ फिचर्स, प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली बसववण्यात आली आहेत. आज लॉन्च केलेली दूनागिरी युद्धनौका नौदलाच्या जुन्या दूनागिरी ASW फ्रिगेटचा अवतार आहे. जुने फ्रीगेट 33 वर्षे सेवा पूर्ण करून 2010 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर आज लॉन्च करण्यात आलेले नवीन फ्रीगेटचे नाव त्याच्याच नावावर ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT