Rajnath Singh,defence ministry  Sakal
देश

भारतातच तयार होणार 100 हून अधिक लष्करी हत्यारं, संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केली यादी

या यादीतील लष्करी यंत्रणा आणि शस्त्रांच्या आयातीवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी गुरुवारी 101 हून अधिक लष्करी यंत्रणा आणि शस्त्रास्त्रांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यानुसार या यादीतील लष्करी यंत्रणा आणि शस्त्रांच्या आयातीवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात येणार असून, याची स्वदेशी उत्पादकांकडूनच खरेदी केली जाणार आहे. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत'च्या कल्पनेच्या दिशेनं संरक्षण मंत्रालयाने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. संरक्षण उपकरणांच्या स्वदेशीकरणाची सकारात्मक यादी जाहीर करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रियादेखील राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी ही यादी जाहीर केली आहे. (Ranath Singh On Deference Equipment )

याआधी पहिली सकारात्मक स्वदेशीकरण यादी ऑगस्ट 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये 155 मिमी/39 कॅल अल्ट्रा-लाइट हॉविट्झर्स, लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCW) Mk-IA-प्रगत स्वदेशी साहित्य, पारंपरिक पाणबुडी आणि दळणवळण उपग्रह GSAT-7C यांचा समावेश होता. राजनाथ सिंह यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये सेन्सर्स, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा, नौदल उपयोगिता हेलिकॉप्टर, गस्ती जहाजे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्रांसह प्रमुख उपकरणे आणि यंत्रणांचा समावेश असणार असल्याचे ते म्हणाले.

गेल्या वर्षी मे महिन्यात, सरकारने साडेचार वर्षांच्या कालमर्यादेसह अतिरिक्त 108 लष्करी शस्त्रे आणि पुढील पिढीच्या युद्धनौका, एअरबोर्न पूर्व चेतावणी प्रणाली, टँक इंजिन आणि रडार यांसारख्या प्रणालींच्या आयातीवर निर्बंध मंजूर केले. संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाला प्रोत्साहन देणे आणि लष्करी उपकरणांची निर्यात करणे ही सरकारची दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत, असे सिंग म्हणाले. ही यादी जाहीर केल्याने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागासह स्वदेशीकरणाला प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT