Rajnath Singh,defence ministry  
देश

संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भरतेचा नारा; राजनाथ सिंह यांची मोठी घोषणा

ऑनलाइन टीम

भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 101 पेक्षा अधिक वस्तूंच्या आयातीवर बंदी घालणार आहे. संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी रविवारी संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण घोषणा केली. संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादनाला चालना देऊन सक्षम आणि आत्मनिर्भर भारतासाठी आयात करण्यात येणाऱ्या संरक्षण सामुग्रावर निर्बंध घालण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाची घोषणा केली आहे. याच उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ज्या उत्पादनाच्या आयातीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत याची यादी तयार करण्यात आली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील या उत्पादनाशी निगडीत मंडळींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

राजनाथ सिंह म्हणाले की, तिन्ही सैन्य दलाने 260 योजनांच्या अंतर्गत एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2020 पर्यंत  3.5 लाख कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. आगामी 5 ते 6 वर्षांत देशांतर्गत उद्योगांना जवळपास 4 लाख कोटी इतक्या रुपयांपर्यंत कंत्राट देणे शक्य होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. 2020 ते 2024 दरम्यान टप्प्याटप्याने आयातीवरील निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT