defense minister, rajnath singh, pm modi, Corona Vaccination 
देश

Corona Vaccination: PM मोदींसह इतर मंत्री लस कधी घेणार? संरक्षण मंत्र्यांनी दिलं उत्तर

सकाळ ऑनलाईन टीम

Corona Vaccination:​ जगभरासह देशात कोरोना संकटाला थोपवण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील मोठ्या मोहिमेचा शुभारंभ झाला. जगभरातील देशांमध्ये राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि प्रमुख राजकीय नेते प्रथम लस घेऊन नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत सरकारने मात्र कोरोना योद्ध्यांना प्राधान्य दिले आहे. विरोधकांकडून देखील मोदी सरकारमधील मंत्री प्रथम लस घेऊन जनतेला लसीची खात्री का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रामुख्याने काँग्रेसच्या नेत्यांनी या प्रकारच्या प्रश्नांनी लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले आहे.  

'आजतक' या हिंदी वृत्त वाहिनेच्या खास कार्यक्रमात यासंदर्भातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान मोंदीसह अन्य नेते लस कधी घेणार? या प्रश्नावर राजनाथ सिंह यांनी देखील थेट उत्तरही दिले. खूप कमी कालावधीत देशातील शास्त्रज्ज्ञांनी कोरोनासारख्या भयावर संकटावर मात करणारी लस शोधून काढली. या कामात सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शास्त्रज्ज्ञांना वेळोवेळी प्रोत्साहन देत आहेत. सध्याच्या घडीला सरकारने लढ्यात सर्वात पुढे असणाऱ्या योद्ध्यांना लस टोचण्याचा प्लॅन केला आहे. या सर्वांना लस टोचून झाल्यानंतर देशातील पन्नाशी ओलांडलेल्या नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. त्यावेळीच पंतप्रधानांसह  सर्व मंत्री आणि राजकीय नेते लस घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जगातील ज्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली त्या देशात प्रमुखांनी प्रथम लस टोचून घेतली आहे. अमेरिकेचे  अध्यक्ष जो बायडेन, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी तर ब्रिटनमध्ये क्वीन एलिझाबेथ आणि पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लस घेत नागरिकांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी ज्या प्रमाणे त्यांच्या देशातील लोकांची भीती दूर केली तो प्रयोग आपल्या सरकारने का नाही केला? असा प्रश्न आनंदपूर साहिबचे काँग्रेस खासदार मनीष तिवाही  यांनी केला आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT