Indian Army Gallery
देश

आत्मनिर्भर भारत! सशस्त्र दलांसाठी 76 हजार कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण संपादन परिषदेच्या (डीएसी) बैठकीत (Defense Acquisition Council) 'बाय इंडियन अँड बाय अँड मेक इंडियन' अंतर्गत 76,390 कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदीच्या (Defence Sector) प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. रफ टेरेन फोर्कलिफ्ट ट्रक, ब्रिज बिल्डिंग टँक, चाके असलेली शस्त्रे, अँटी-टॅंग गाईडेड मिसाईल्स आणि वेपन लोकेटिंग रडारचा विकास, उत्पादन आणि खरेदी आदींचा समावेश असणार आहे. ()

सोमवारी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (DAC) बैठकीत लष्कर, हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दलासाठी 76,390 कोटींच्या खरेदीसाठी अप्रेंटिसेस ऑफ नेसेसिटी (AON) मंजूर करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, DAC ने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) डॉर्नियर विमान आणि सुखोई-30 MKI एरो इंजिन तयार करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली असून, स्वदेशीकरण वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

याशिवाय संरक्षण मंत्रालयाने लष्करासाठी ब्रिज लेइंग टँक्स, अँटी टँक गाईडेड मिसाईल्स (ATGMs), रफ टेरेन फोर्क लिफ्ट ट्रक्स (RFLTs) आणि वेपन लोकेटिंग रडारने (WLRs) सुसज्ज व्हील आर्मर्ड फायटिंग व्हेइकल्स (AFVs) खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.

तर, नौदलासाठी (Indian Navy) 36 हजार कोटींच्या कॉर्विट्स (युद्धनौका-युद्धनौका) मंजूर करण्यात आल्या आहेत. युद्धनौकांची संख्या देण्यात आली नसली तरी संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या नेक्स्ट जनरेशन कॉर्विट (NJC) व्हर्सटाईल युद्धनौका असतील. या युद्धनौकांचा वापर टेहळणी मोहिमा, एस्कॉर्ट ऑपरेशन्स, पृष्ठभागावरील कारवाई गट, शोध आणि हल्ला आणि किनारी सुरक्षा यासाठी केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT