delhi crime 
देश

Crime News: आठवीच्या मुलावर वर्गमित्रांकडूनच काठीने लैंगिक अत्याचार, आतड्यांना इजा, एक महिना रुग्णालयात

Delhi Crime News: आठवीच्या वर्गातील मुलाला तब्बल एक महिना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशाच्या राजधानीमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. भयानक म्हणजे त्याच्या वर्गमित्रांनी हा लैंगिक अत्याचार केला आहे. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठवीच्या वर्गातील मुलाला तब्बल एक महिना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं आहे. मुलाला सध्या घरी आणण्यात आलंय अशी माहिती पीडित मुलाच्या आईनी दिली. आईने सांगितलं की, मुलगा एका दिवशी शाळेतून घरी आला आणि पोटात खूप दुखत असल्याची तक्रार करु लागला. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी मुलावर झालेला क्रूर प्रकार समोर आला.

डॉक्टरांनी सुरुवातीच्या तपासण्या केल्या. त्यानंतर मुलाची सर्जरी करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी आईला सांगितलं. मुलाची सर्जरी झाली, शुद्धीवर आल्यानंतर मुलांने आईसमोर आपबीती सांगितली. मुलाने जे काही सांगितलं ते ऐकून आईला धक्काच बसला.

१८ मार्च रोजी ही घटना घडली आहे. मुलाला खोटं सांगून वर्गातून बाहेर नेण्यात आलं. त्यानंतर त्याच्या वर्गातील काही सहकाऱ्यांनी त्याच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केले आहेत. आईने केलेल्या दाव्यानुसार, काही मुलांनी त्यांच्या मुलाला मारलं. त्याचे कपडे काढण्यात आले आणि काठीने मारहाण करण्यात आली. काठी त्याच्यामध्ये घुसवण्यात आली, त्यामुळे त्याच्या आतड्यांना गंभीर इजा झाली आहे.

बाहेर कोणाला बोलला तर आणखी तुला मारण्यात येईल अशी धमकी त्याला देण्यात आली. भीतीपोटी मुलगा १० दिवस कोणाला काही बोलला नाही. त्याला घटनेचे गांभीर्य कळाले नाही. महिलेने आपल्या पीडित मुलासाठी न्यायाची मागणी केली आहे. महिलेने दोषी मुलं आणि शाळा प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. माझा मुलगा रोज भीतीने जागा होतो असं म्हणत महिलेने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

डॉक्टरांनी सांगितलं की, पीडित मुलगा अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. मुलाची तीन महिन्यानंतर आणखी एक सर्जरी करावी लागणार आहे. कारण, त्याच्या अनेक अंतर्गत अवयवांना इजा झाली आहे. दरम्यान, सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाय पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT