Arvind Kejriwal Narendra Modi  sakal
देश

Arvind Kejriwal : जर मी चोर, तर मग जगात कोणीच इमानदार नाही; केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्यधोरण प्रकरणी सीबीआयने समन्स बजावल्यानंतर मोदी सरकारवर हल्ला बोल केला आहे. तसेच आपण चोर असेल तर जगात कोणीही इमानदार नसल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं.

माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया यांच्यावर 14 फोन फोडल्याचा आरोप आहे. मग ईडी सांगते त्यापैकी 4 फोन आमच्याकडे आहेत. तर सीबीआय म्हणतं 1 फोन आमच्याकडे आहे. मग जर सिसोदियांनी फोन तोडले असेल तर त्यांना कॉल कसे आले, असा सवाल करत या लोकांनी खोटे बोलून दारुचा घोटाळा झाल्याचा आव आणल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, सीबीआय, ईडीने मद्यधोरण प्रकरणात न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले, ते मनीष सिसोदिया आणि माझ्याविरोधात साक्ष देण्यासाठी लोकांवर अत्याचार करत आहेत. ईडी, सीबीआयने १०० कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी ४०० हून अधिक छापे टाकले, पण ही रक्कम सापडली नाही. केजरीवाल पुढे म्हणाले की, दिल्ली उत्पादन शुल्क धोरण उत्कृष्ट होते. त्यामुळे भ्रष्टाचार संपला असता.

What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

ज्या दिवशी मी दिल्ली विधानसभेत भ्रष्टाचाराविरोधात बोललो, त्या दिवशी मला माहित होते की पुढचा क्रमांक माझा असेल. गेल्या ७५ वर्षांत 'आप'सारखे कोणत्याही पक्षाला टार्गेट करण्यात आलेले नाही; आम्ही लोकांमध्ये चांगल्या शिक्षणाची आस निर्माण केली. मात्र त्यांना ही आस संपवायची असा आरोप केजरीवाल यांनी केला.

यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवताना म्हटले की, एवढ्या कारवाईनंतरही एक पैसाही मिळाला नाही. केजरीवाल म्हणाले, 17 सप्टेंबर ला संध्याकाळी 7 वाजता मी नरेंद्र मोदींना एक हजार कोटी रुपये दिले होते. करा मग त्यांना अटक. कोणीही देशात उभे राहून काहीही बोलतील. या आधारावर तुम्ही नरेंद्र मोदींना अटक करणार का? त्यासाठी काही पुरावे लागतील. असंही केजरीवाल यानी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP result update : कोल्हापुरातील पहिली अपडेट आली समोर, काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर; पाचगावचे संग्राम पाटील यांची आघाडी

Gold Rate Today : सोनं-चांदीचे भाव पुन्हा वाढले! चांदी 15,000 रुपयांनी महाग; जाणून घ्या ताजा भाव

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या आयेशा बेगम नासेर हुसेन सय्यद विजयी

Sangli : काळाचा क्रूर घाला! भावाच्या अंत्यविधीला आलेल्या बहिणीचा कारवर झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू; माजी खासदारांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, बोरगाववर शोककळा

Khatron Ke Khiladi 15: ‘खतरों के खिलाडी’च्या पंधराव्या सीझनची थरारक झलक, रोहित शेट्टी पुन्हा होस्ट

SCROLL FOR NEXT