Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल आतंकवादी नाहीत, उच्च न्यायालयात काय घडलं? सीबीआयला देखील नोटीस

Delhi Excise Policy Scam : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात ईडीकडून जामीन मिळाल्यानंतर सीबीआयने अटक केली. या अटकेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हानही दिले होते.

Sandip Kapde

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर शुक्रवारी (5 जुलै 2024) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकणी केजरीवाल तुरुंगात आहेत. दरम्यान उच्च न्यायालया सीबीआयने ला नोटीस पाठवली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे.

सुनावणीदरम्यान दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी भूमिका मांडली. अरविंद केजरीवाल हे आतंकवादी नाहीत. त्यांना जमानत का मिळत नाही, असा सवाल वकिलांनी उपस्थित केला.

यावर न्यायालयाने म्हटले तुम्हाला खालच्या कोर्टात देखील जामीन मिळू शकतो. मग तुम्ही हायकोर्टात का आलेत, असा सवाल न्यायालयाने केला.  न्यायालयाने सीबीआयला देखील सुनावणीदरम्यान उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला आहे. 

यावर केजरीवाल यांच्या वकिलांनी सांगितले, "सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत जे आम्हाला थेट येथे येण्याचा अधिकार देतात. तिहेरी चाचणीच्या अटी आम्हाला लागू होत नाहीत. फरार होण्याचा धोका नाही. गुन्हा दाखल होऊन दोन वर्षांनी ही अटक झाली आहे, याचीही नोंद घ्यावी." अभिषेक मनु सिंघवी यांनी हा युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT