Delhi CM Arvind Kejriwal explanation on eating sweets and mangoes After Ed Claim marathi News  
देश

Arvind Kejriwal News : जामिनासाठी मी लकवा मारून घेण्याचा धोका पत्करेन का? केजरीवाल यांचा कोर्टासमोर सवाल

Arvind Kejriwal News : केजरीवाल हे जामिन मिळावा म्हणून आंबे आणि मिठाई खात असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयामध्ये केल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

   
नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामिन मिळावा म्हणून आंबे आणि मिठाई खात असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयामध्ये केल्यानंतर एकच खळबळ निर्माण झाली होती. आता केजरीवाल यांनी मात्र त्या दाव्याचे खंडन करताना तुरुंगात असताना केवळ ४८ वेळा घरून जेवण आले आणि फक्त तीनदाच आंबे खाल्ले असे म्हटले आहे.

केजरीवाल यांच्यावतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी ही माहिती दिली. केजरीवाल यांना ८ एप्रिलनंतर आंबे पाठविण्यात आले नसल्याची माहिती त्यांनी दिली. ‘ईडी’च्या आरोपात कोणतेही तथ्य नसून जामिनासाठी मी लकवा मारून घेण्याचा धोका पत्करेन का? असा सवाल केजरीवाल यांनी न्यायालयासमोर केला.

केजरीवाल यांच्या प्रकृतीची एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांमार्फत तपासणी केली जाऊ शकते असे ‘ईडी’च्या वकिलांकडून सांगण्यात आले असता ॲड. सिंघवी यांनी ‘ईडी’च्या सल्ल्याची आम्हाला गरज नसल्याचे सांगितले. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आंबा, चिक्कू, केळी खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला ‘एम्स’ने दिला असल्याचे तिहार तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नेमकी मागणी काय?


मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन दिले जावे तसेच दररोज १५ मिनिटे डॉक्टरांशी चर्चा करण्याची परवानगी दिली जावी, अशा विनंती केजरीवाल यांनी विशेष न्यायालयामध्ये केली होती. त्यावेळी पत्नी सुनीता यांना देखील उपस्थित राहू दिले जावे अशी असेही त्यांनी म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

SCROLL FOR NEXT