Arvind Kejriwal 
देश

चीनच्या ताब्यातील जमीन परत मिळवणार ते मोफत वीज अन् उपचार; केजरीवालांच्या देशवासीयांना 10 गॅरंटी

Arvind Kejriwal 10 Guarantees : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशवासीयांना १० गॅरंटी दिल्या आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटी समोर केजरीवालांच्या गॅरेंटी ठेवल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी देशवासीयांना १० गॅरंटी दिल्या आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर या गॅरंटी पूर्ण केल्या जातील असं ते म्हणाले आहेत. त्यांनी नेमक्या कोणत्या गॅरंटी दिल्यात ते पाहूया.

केजरीवाल यांच्या १० गॅरंटी

१. देशातील जनतेला मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल. याअंतर्गत गरिबांना २०० यूनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल. यासाठी १.२५ लाख कोटी रुपये खर्च होतील

२. देशातील प्रत्येक नागरिकावर मोफत उपचार केले जातील. सरकारी हॉस्पिटलची स्थिती सुधारण्यात येईल

३. अग्निवीर योजना बंद केली जाईल आणि अग्निवीरांना कायमस्वरुपी नोकरी दिली जाईल

४. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल

५. एका वर्षामध्ये २ कोटी रोजगार उपलब्ध करून दिले जातील.

६. भाजपच्या वॉशिंगमशीनला चौकात फोडलं जाईल. देशाला भ्रष्टाचार मुक्त केलं जाईल.

७. जीएसटीचे सुलभीकरण केले जाईल. अशी सुविधा केली जाईल जिथे व्यापारी मोकळेपणाने व्यापार करु शकतील

८. सरकारी शाळेमध्ये खासगी शाळांपेक्षा चांगलं शिक्षण दिलं जाईल. यासाठी ५ लाख कोटी रुपये लागतील. यासाठी राज्य सरकार अर्धे आणि केंद्र सरकार अर्धे पैसे देईल

९ देशाच्या जितक्या जमिनीवर चीनने ताबा मिळवला आहे, ती सर्व जमीन पुन्हा मिळवली जाईल. यासाठी सैन्याला पूर्ण सूट दिली जाईल.

१०. शेतकऱ्यांना त्यांच्या धान्यावर एमएसपीच्या आधारे पूर्ण किंमत दिली जाईल.

कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात प्रचार करता आला नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांना सध्या अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यांना प्रचार करता येणार आहे. केजरीवाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT