Chitra ramkrishna Sakal Digital
देश

चित्रा रामकृष्णांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; घरच्या जेवणाला कोर्टाचा नकार

चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने 24 फेब्रुवारीला अटक केली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : NSC शी संबंधित गोपनीय माहिती एका आध्यात्मिक योगीसोबत शेअर केल्याचा आरोप असलेल्या माजी राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज (NSE) चित्रा रामकृष्ण यांना आज दिल्ली न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रामकृष्ण यांच्यावर NSC शी संबंधित गोपनीय माहिती एका आध्यात्मिक योगीसोबत शेअर केल्याचा आरोप असून, या आरोपाखाली चित्रा यांना सीबीआयने 24 फेब्रुवारीला अटक केली होती. (NSE Chitra Ramkrishna News)

दरम्यान, न्यायालयाने चित्रा रामकृष्ण यांनी केलेल्या घरचे जेवण आणि इतर सुविधा मिळण्याची मागणी फेटाळत प्रत्येक कैदी सारखाच असतो. त्या व्हीआयपी कैदी असू शकत नाही. त्यासाठी नियम बदलले जाऊ शकत नाहीत असे न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी नमूद केले. न्यायालयाने चित्रा यांना हनुमान चालिसा आणि भगवद्गीता पुस्तकांची प्रत बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे.

चित्रा रामकृष्ण यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, या गुन्ह्यांत चित्रा या एक महत्वाची व्यक्ती असून आणि त्यांचे परदेश दौरा आणि अन्य महत्वाच्या बाबींचा तपास अजूनही सुरू असल्याचा युक्तिवाद करून सीबीआयने रामकृष्ण यांना जामीन न देण्याची मागणी करत त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची मागणी केली. त्यास न्यायालयाने परवानगी देत रामकृष्ण यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत हनुमान चालीसा आणि भगवद्गीता या प्रार्थना पुस्तकांची प्रत बाळगण्याची परवानगी दिली आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT