Delhi Crime News esakal
देश

ऑफिसला दांडी मारली म्हणून फोन केला; म्हणाला, मी सर्वांना मारलंय! मन सून्न करणारी घटना

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये हादरवून सोडणारा प्रकार घडला आहे. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने पत्नी आणि दोन मुलांवर चाकूने सपासप् वार केले. त्यानंतर त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.

दिल्लीतल्या शाहदरा येथील ज्योती कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. दिल्लीत राहणारे सुशील कुमार (वय ४५), पत्नी अनुराधा (वय ४०), मुलगी आदिती ( वय ६) यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. तर तेरा वर्षांच्या युवराजवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शाहदराचे पोलिस उपायुक्त रोहित मीना यांनी माहिती दिली की, सुशील कुमार हे दिल्ली मेट्रोमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांवर चाकूने वार केले. त्यानंतर स्वतःला फाशी घेतली.

फाशी घेण्यापूर्वी सुशीलने संगणकावर फाशी कशी घ्यायची, याची माहिती घेतली होती. दिल्ली मेट्रोच्या कर्मचाऱ्याने पोलिसांना यासंबंधीची माहिती दिली. सुशील कार्यालयात न आल्याने त्यांना एका सहकाऱ्याने फोन केला. तेव्हा सुशीलने 'मी सगळ्यांना मारले' असं सांगितलं. त्यामुळे घटनेचा खुलासा झाला.

त्यानंतर पोलिसांना यासंबंधीची माहिती देण्यात आली. पोलिस सुशीलच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी तीन मृतदेह सापडले. सुशीलने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी आणि दोन मुलांवर चाकूने सपासप् वार केले. यामध्ये पत्नी आणि मुलगी आदिती यांचा मृत्यू झाला तर युवराज या मुलावर उपचार सुरु आहेत.

या खूनाच्या घटनेने दिल्ली हादरली आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. फॉरेन्सिकची टीमने घटनास्थळाची पाहाणी केली. सुशीलने हे हत्याकांड का केलं, याचं कारण कळलेलं नाही. पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT