Delhi Excise Policy Row : सीबीआयच्या कारवाईनंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठा दावा केला आहे. आम आदमीला रामराम करून भाजपमध्ये या असा गंभीर आरोप सिसोदिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी भाजपने आपल्याला पाठवलेल्या संदेशात 'आप' सोडून भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला असून, असे केल्यास सीबीआय-ईडीची चौकशी बंद केली जाईल असेही भाजपकडून सांगण्यात आल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे. दिल्लीतील नव्या अबकारी धोरणासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान सिसोदियांनी वरील दावा केला आहे.
सिसोदिया यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "मला भाजपचा संदेश मिळाला आहे- "आप" सोडून भाजपमध्ये सामील व्हा, सीबीआय ईडीचे सर्व खटले बंद होतील. त्यावर आपण मी राजपूत, महाराणा प्रताप यांचा वंशज असून, डोकं कापून घेईल पण भ्रष्टाचारी आणि षड्यंत्र करणाऱ्यांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व केसेसं खोट्या असून जे काय करायचे आहे ते करा असे आव्हान सिसोदियांनी उत्तरात दिले आहे.
दिल्लीतील नव्या अबकारी धोरणासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईदरम्यान सिसोदियांनी वरील दावा केला आहे. सीबीआयने या प्रकरणी सुमारे 13 जणांच्या ठिकाणांवर छापे टाकून अनेक कागदपत्रे जप्त केली असून, या उत्पादन शुल्क धोरणामुळे आम आदमी पक्षाने आपल्या निकटवर्तीयांना फायदा करून दिला, त्यामुळे दिल्ली सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा भाजपने केला आहे.
भाजपकडून स्पष्टीकरण
दरम्यान, सिसोदियांच्या या दाव्यावर भाजप नेते आणि खासदार परवेश वर्मा यांनी स्पष्टीकरण देत सिसोदिया यांच्यासारख्या नेत्यांना भाजपमध्ये स्थान नसल्याचे म्हटले आहे ."केजरीवाल आणि सिसोदिया यांनी गुजरातमध्ये केलेल्या गोष्टी दिल्लीत का राबवल्या नाहीत हे स्पष्ट करत नाहीत." अबकारी धोरणातील कथित घोटाळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या मुलीचा सहभाग असल्याच्या प्रश्नावर वर्मा म्हणाले की, केसीआर यांच्या मुलीवर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे खरे आहेत आणि लवकरच या घोटाळ्यात सहभागी असलेले सर्वजण तुरुंगात जातील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.