delhi fire rani jhansi road  
देश

#Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय? 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील राणी झाशी रोडवरील झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील बळींची संख्या 43वर गेली आहे. दिल्ली सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असून, जखमींवरील उपचारांचा खर्चही दिल्ली सरकार उचलणार असल्याचे जाहीर करण्यात आला आहे. पोलिसांनी आगीच्या घटनेची प्राथमिक चौकशी केली असून, घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलाय. 

मुख्यमंत्री काय म्हणाले?
आगीच्या दुर्घटने संदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मीडियाशी संवाद साधला त्यात केजरीवाल म्हणाले, 'मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून दहा लाखांची मदत देण्यात येईल. तसेच जखमींना एक लाख रुपये मदत देण्यात येईल. जखमी तसेच भाजलेल्या कामगारांवर दिल्लीच्या सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत.' एक जखमी व्यक्ती 50 टक्के भाजली आहे. तर, इतर आठ जणांना धुरामुळे गुदमरण्याचा त्रास झाला आहे. या सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची एकूण संख्या 15 असून, 59 जणांना आगीतून वाचवण्यात यश आलंय, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. 

काय आहे कारण?
आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रांधवा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीत शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान, आगीच्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आलाय. त्यांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असल्याचं सांगण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT