Delhi Girl Accident Nidhi eyewitness deceased woman friend said Men in car knew she was stuck under their car  
देश

Delhi Girl Accident : ती गाडीखाली अडकल्याचं त्यांना माहिती होतं, तरीही…; मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीतील कंझावला प्रकरणात मंगळवारी आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले. यामध्ये घटनेच्या काही तास आधी पीडित मुलगी एका हॉटेलबाहेर दुसऱ्या मुलीशी भांडताना दिसून आली. त्यानंतरपोलीस तपासात पीडित मुलीशिवाय दुसरी मुलगी तिची मैत्रिण असल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या वेळी पीडितेचा ही मैत्रीण तिच्यासोबत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणीतील एका हॉटेलच्या बाहेर रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये पीडित अंजली सिंह ही तिची मैत्रिण निधीसोबत वाद घालताना दिसत आहे. जिथे त्याने शनिवारी संध्याकाळी नववर्षाच्या पार्टीला हजेरी लावली होती. दोघी हॉटेलबाहेर भांडत होत्या. हे पीडीतेच्या मृत्यूच्या केवळ 15 मिनिटे आधी घडले होते.

पीडितेच्या मैत्रिणीने मोठा खुलासा

याप्रकरणी आता पीडितेची मैत्रिण निधीने माहिती दिली आहे. निधीने सांगितले की, कारने त्यांना समोरून धडक दिली. त्यानंतर मी घाबरले होते. म्हणून मी कोणाला काहीच सांगितले नाही. ती (पीडिता) गाडीखाली अडकली होती. गाडी तिला ओढत घेऊन गेली. माझ्या घरचे या प्रकरणात अडकू नयेत अशी माझी इच्छा होती, त्यामुळे काहीच बोलले नाही. आधी आम्ही हॉटेलच्या बाहेर भांडत होतो, ती म्हणत होती की मी स्कूटी चालवणार आणि मी म्हणत होते की मी चालवणार, कारण ती खूप दारू प्याली होती. त्यानंतर ती स्कूटी चालवत होती.

निधीने सांगितले की, आधी आम्ही एका ट्रकला धडक बसण्यापासून थोडक्यात बचावलो. त्यानंतर मी तिला स्वत: गाडी चालवते असं म्हटलं, चावीही मागितली. तसेच त्यावेळी ती खूप मद्यधुंद अवस्थेत होती असेही निधीने सांगितेलं. खोलीत कसलेच भांडण झाले नाही असंही ती म्हणाली. तसेच निधीने सांगितले की, कार स्कूटीला धडकल्यानंतर मी एका बाजूला पडले, माझी मैत्रिण गाडीखाली अडकली.

गाडी चालवणाऱ्याना मुलांना माहिती होतं की गाडीखाली मुलगी अडकली आहे, ती खालून ओरडत होती, असंही निधीने सांगितले. बॉयफ्रेंडबद्दलच्या प्रश्नावर निधीने सांगितले की, तो तिची वैयक्तिक बाब आहे, मला काय झाले हे माहित नाही.

हॉटेल कर्मचारी काय म्हणाले?

त्यांच्या भांडणामुळे त्यांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेल सोडण्यास सांगितले. OYO हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, ते एकमेकांशी भांडत होते आणि शिवीगाळ करत होते, त्यामुळे मॅनेजरने त्यांना निघून जाण्यास सांगितले. ते त्यांच्या स्कूटीवरून निघून गेले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये निधी अंजलीची स्कूटी चालवताना दिसत आहे तर अंजली मागे बसलेली आहे. काही वेळाने दोघीही जागा बदलतात आणि मग अंजली स्कूटी चालवते.

या अपघातात निधीला किरकोळ दुखापत

या अपघातात निधीला किरकोळ दुखापत झाली असून तिने घटनास्थळावरून पळ काढला. ती घाबरली होती, असे तिने पोलिसांना सांगितले. तरुणाच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालही मंगळवारी आला आहे. डोक्याला, पाठीचा कणा आणि खालच्या अंगाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव आणि आघातामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सुलतानपुरी येथील रहिवासी असलेली ही तरुणी एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्ममध्ये काम करत होती. अपघाताच्या दिवशीही ती कामानिमित्त बाहेर गेली होती. सोमवारी, पोलिसांनी कारमधील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर न्यायालयाने सोमवारी पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT