Delhi girl Stabbed 20 times then battered with boulder as people walk by Crime news  sakal
देश

Delhi Girl Stabbed : क्रूरतेची हद्द! प्रेयसीला आधी २० वेळा भोकसलं, चाकू डोक्यात अडकला म्हणून दगडानं…

रोहित कणसे

एका १६ वर्षीय मुलीची तिच्याच प्रियकराने २० पेक्षा जास्त वेळा चाकून वार करत निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून मृत मुलगी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते, मात्र या दोघांचे भांडण झाले होते. दरम्यान अगदी वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही अल्पवयीन मुलगी एका वाढदिवसाच्या पार्टीला जात असताना आरोपी साहिल (वय २०) ने तिला रस्त्यात अडवलं आणि तिच्यावर चाकूने २० पेक्षा अधिक वेळा वार केले. यादरम्यान चाकू पीडितेच्या डोक्यात अडकला यानंतर नराधमाने जवळच पडलेला दगड उचलून तिचे डोकं ठेचलं. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

या भीषण प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहबाद डेअरी पोलीस स्टेशन येथे आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

लोक नुसतं पाहात राहिले..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीच्या रोहिणी भागातील आहे. १६ वर्षीय साक्षीचे साहिलसोबत भांडण झाले होते. त्यानंतर साहिलने साक्षीची निर्घृण हत्या केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ फुटेजमध्ये साहिल साक्षीला एका गल्लीत वारंवार भोसकताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावरून लोक जात-येत असताना देखील दिसत आहेत. मात्र त्याला कोणीही अडवलं नाही.

सध्या सध्या आरोपी साहिल हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT