Covid19 
देश

धक्कादायक ! कोरोनाग्रस्तांचे अंतिम संस्कार करण्यासाठी जमीनी शोधण्याचे आदेश

पीटीआय

नवी दिल्ली - देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना नवीन कोरोना बाधितांना दाखल करण्याची जागा उपलब्ध करण्यास सांगितलं आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंतिम संस्कार करण्यासाठी किंवा त्यांना पुरण्यासाठी अधिकची जागा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक आदेश जारी केला आहे. यानुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बुधवारपर्यंत मिळालेली जागा आणि जमीनीसंबंधीची माहिती देण्यास सांगितलं आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दिल्लीत covid-19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन अगोदरच योजना तयार असणे आवश्यक आहे. त्यामुळे covid-19 रुग्णांना अधिकच्या बेडची व्यवस्था आणि अंतिम संस्कार करण्यासाठी जागा निश्चित करणे गरजेचं आहे, असं सरकारने काडलेल्या आदेशात म्हणण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20,000 च्या पुढे गेली आहे. तसेच कोरोना विषाणूने आतापर्यंच 523 लोकांचा जीव घेतला आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत अधिकची माहिती दिली आहे. दिल्ली सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे आयसोलेशन कोचची मागणी केली होती. त्यानुसार 10 कोच उपल्बध करुन देण्यात आले आहेत. एका कोचमध्ये 160 रुग्णांना ठेवले जाऊ शकते. हे कोच सध्या शकूरबस्ती येथे ठेवण्यात आले आहेत. मात्र, यांची हालचाल केली जाऊ शकते. या कोचमध्ये वातानुकूलीत सेवा नसते. दिल्ली सरकार आणि रेल्वे विभाग मिळून याचे व्यवस्थापन करत आहेत, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक! प्रवाशांचे होणार हाल; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन

New Kabaddi Rules Changes 2026 : कबड्डीचे नियम बदलले! आता बदली खेळाडू आणि लॉबीच्या नियमात मोठा बदल; जाणून घ्या कबड्डीचे नवीन 6 नियम

IND vs WI: वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयामागे धोनीचा हात? शाय होपने उघडलं राज; म्हणाला, ‘माहीने मला हेच सांगितलं होतं...’

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

BSF Jawan: देशसेवेचे स्वप्न साकारले, २२ वर्षे सीमांवर कर्तव्य बजावले; BSF जवानाचा अचानक मृत्यू, कर्तव्यावर अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT