Arvind Kejriwal File photo
देश

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा

कोरोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत, ज्या परिवाराने त्यांचा मुख्य आधार गमावला आहे, त्यांच्यासोबत आम्ही आहोत.

वृत्तसंस्था

कोरोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत, ज्या परिवाराने त्यांचा मुख्य आधार गमावला आहे, त्यांच्यासोबत आम्ही आहोत.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील कोरोना परिस्थितीबाबत माध्यमांना माहिती दिली. तसेच कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींबाबत एक महत्त्वाची घोषणाही केली. दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ८ हजार ५०० वर पोहोचली आहे. संक्रमणाचा दर घटला असून १२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या १० दिवसांत दिल्लीत १० हजार बेड रिकामे झाले आहेत, मात्र आयसीयूचे बेड (ICU) अजूनही भरलेले आहेत. गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांची संख्या कायम आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या घटण्यामागे लॉकडाऊन (Lockdown) हे एक कारण आहे. दिल्लीकरांनी या दिवसांत केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झालं आहे, असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (Delhi govt take care of orphan childrens and older peoples informed CM Arvind Kejriwal)

जर आपण निष्काळजीपणा केला तर कोरोना पुन्हा उसळी घेईल. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी शक्य तेवढे उपाय करणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीत दुर्लक्ष करून चालणार नाही. दिल्ली सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनामुळे जी मुले अनाथ झाली आहेत, ज्या परिवाराने त्यांचा मुख्य आधार गमावला आहे, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी दिल्ली सरकार घेत आहे. दिल्लीतील परिस्थितीमध्ये सुधारणा दिसत आहे, पण कोरोनाशी सुरू असलेली लढाई अजूनही कायम आहे.

कोरोना रुग्णांची संख्या घटतेय

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांना लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. एप्रिल महिन्यात दिल्लीत २८ हजार कोरोना केसेस आढळत होत्या. त्यावेळी संक्रमणाचा दर ३६ टक्क्यांवर पोहोचला होता. गेल्या २४ तासांमध्ये आढळलेली संख्या पाहता संक्रमणाचा दर १२ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

गेल्या १० दिवसांत ३ हजार बेड रिकामे झाले आहेत. आयसीयू बेड अजूनही भरलेले आहेत. तसेच आणखी १२०० नवीन आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या नियमांचे दिल्लीकरांनी पालन केल्यामुळेच रुग्णसंख्येत घट झाली आहेत. गेल्या काही महिन्यापासून दिल्लीत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दररोज २५ हजारांपर्यंत नव्या केसेस आढळत होत्या. तसेच हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. पण लॉकडाउन लागू केल्यानंतर दिल्लीच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT