Stone throwing in Hanuman Jayanti procession Stone throwing in Hanuman Jayanti procession
देश

दिल्लीत हनुमान जयंती मिरवणुकीत दगडफेक; वाहनांची तोडफोड, पोलिस जखमी

सकाळ डिजिटल टीम

हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) शनिवारी (ता. १६) निघालेल्या मिरवणुकीत दिल्लीच्या जहागीर पुरीमध्ये दगडफेक (Stone throwing) झाली. यावेळी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. अनेक पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. मिरवणूक काढली जात असताना हा हिंसाचार सुरू झाला आणि बघता बघता अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. (Stone throwing in Hanuman Jayanti procession)

सध्या मैदानावर तणावाचे वातावरण आहे. जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येते. मिरवणुकीवर दगडफेक केल्याचेही सांगण्यात आले. यावेळी पोलिसांकडून या घटनेवर काहीही बोलण्याचे टाळले जात आहे.

मिरवणुकीदरम्यान (Hanuman Jayanti) दगडफेकीनंतर (Stone throwing) प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. ही घटना कुशल सिनेमाजवळ सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. लोकांनी दोन वाहने जाळली. एका दुकानालाही आग लागली आहे. एका पोलिसालाही गोळी लागल्याचे वृत्त आहे. जिल्हा पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आहेत. तपासासोबतच लोकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जहांगीरपुरी येथे मिरवणुकीत (Hanuman Jayanti) निघालेल्या लोकांवर दगडफेक आणि तुरळक जाळपोळ करण्यात आली आहे. आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. अतिरिक्त फौजफाटा तैनात केल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. या गोंधळात अनेक पोलिस जखमी (Police injured) झाल्याचे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल! काय आहे आजचा भाव? पुढे सोनं महागणार की स्वस्त होणार?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई विमानतळ आज सहा तास बंद राहणार

Thalapathy Vijay Tamil Nadu Politics : थलपती विजय यांच्याकडे बहुमत नाही, तामिळनाडून सत्तागणिताच्या तीन शक्यता; द्रमुक आणि अण्णाद्रमुक 'विजयी' वारू रोखणार?

Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषदेत गटनोंदणीला वेग; मोहिते-पाटील गटाचा नवा राजकीय समीकरण, चार पक्ष आणि तीन आघाड्या!

Stock Market Today: शेअर बाजाराची संथ सुरुवात; ट्रम्पच्या धमकीने गुंतवणूकदार सावध

SCROLL FOR NEXT