same sex marriage google
देश

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यतेसाठी दिल्ली HC मध्ये याचिका, सुनावणी सुरू

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हिंदू विवाह कायदा (hindu marriage act), विशेष विवाह कायदा आणि विदेशी विवाह कायद्याअंतर्गत समलिंगी विवाहाला (same sex marriage) मान्यता आणि नोंदणीची मागणी करणाऱ्या अनेक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi high court) दाखल आहेत. आज या याचिकांवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येत आहे.

आपल्या देशात अनेक समलिंगी जोडपे आहेत. मात्र, लग्नासाठी समाजासोबतच त्यांना कायदेशीर मान्यतेची गरज असते. पण, देशात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता नसल्याने अनेक समलिंगी जोडपे विदेशात जाऊन लग्न करतात आणि तिथेच विवाहासाठी नोंदणी करतात. या विवाहासाठी कायदेशारी मान्यता मिळावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात यावर सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत प्रतिकूल मत नोंदवलं होतं.

'आपल्या देशातील संसदेने तयार केलेले कायदे पुरुष आणि स्त्रीमध्ये झालेल्या विवाहालाच मान्यता देतात. वेगवेगळ्या धार्मिक समुदायांचे रितीरिवाज, संस्कृती आणि त्यांच्या पारंपरिक कायद्यांचा त्यात समावेश आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या हस्तक्षेपामुळे देशातील या कायद्यांचं संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. तसेच त्यावरून अनागोंदी निर्माण होईल,' असं मत केंद्र सरकारने उच्च न्यायालयात मांडलं होतं.

दरम्यान, आज या याचिकांवर सुनावणी होत आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाचा या याचिकांवर काय निर्णय येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT