Delhi HC Karwa Chauth Divorce eSakal
देश

Delhi HC : पत्नीने केलं नाही 'करवा चौथ'चं व्रत, पतीने मागितला घटस्फोट! 'ही क्रूरता' म्हणत हायकोर्टाने दिली परवानगी

कुटुंब न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केला होता. यानंतर पत्नीने हायकोर्टात धाव घेतली होती.

Sudesh

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशी आपल्याकडे मान्यता आहे. त्यामुळेच पती-पत्नीचं नातं अगदी पवित्र मानलं जातं. मात्र काही कारणाने या नात्यामध्ये कडवटपणा येतो, आणि काही वेळा प्रकरण घटस्फोटापर्यंतही जातं.

घटस्फोटासाठी कित्येक वेळा अगदी क्षुल्लक कारणं दिली जातात. तर, काही प्रकरणांमध्ये दोघांसाठी वेगळं होणंच योग्य असतं. दिल्ली हायकोर्टामध्ये अशाच एका प्रकरणावर सुनावणी पार पडली. ज्यामध्ये हायकोर्टाने पतीची मागणी मान्य करत, घटस्फोट कायम ठेवला आहे.

पत्नी आपल्यासाठी 'करवा चौथ'चं व्रत ठेवत नसल्याचं म्हणत पतीने घटस्फोट मागितला होता. कुटुंब न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केला होता. यावर पत्नीने हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि जस्टिस नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला.

काय आहे प्रकरण?

आपली पत्नी करवा चौथचा व्रत ठेवत नाही, तसंच ती आपल्याला पतीही मानत नसल्याचं म्हणत या व्यक्तीने घटस्फोटाची मागणी केली होती. आपली पत्नी दुसऱ्याच एका पुरूषाला आपला पती मानत होती. तसंच, आई-वडिलांच्या जबरदस्तीमुळे हे लग्न केल्याचं तिने आपल्या जबाबात म्हटलं होतं. यामुळे, पतीने घटस्फोटाची मागणी केली होती.

पत्नी द्यायची आत्महत्येची धमकी

याव्यतिरिक्त, पत्नीने पतीच्या कुटुंबीयांवर हुंड्याची मागणी केल्याचा आरोप केला होता. मात्र, हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. सोबतच, रेकॉर्डवर असलेल्या पुराव्यांनी हे सिद्ध झालं आहे; की या प्रकरणातील पत्नीने आपल्या पतीला दोन वेळा आत्महत्येची धमकी देखील दिली होती. अशा प्रकारच्या धमक्यांचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो; असंही न्यायमूर्तींनी म्हटलं.

या जोडप्याचं 2011 साली लग्न झालं होतं. त्यानंतर सहाच महिन्यात हे दोघे वेगवेगळे राहू लागले होते. एखाद्या पत्नीने आपल्या पतीला स्वीकार न करणं, दुसऱ्याच व्यक्तीला आपला पती मानणं, अशा गोष्टी क्रूरता असल्याचं म्हणत हायकोर्टाने कुटुंब न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नैतिकतेला तडा! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक, जनतेचा संताप उसळला...

Eknath Shinde : लाडक्‍या बहिणीच बदलतील कारभारी; शिवसेना उमेदवारांसाठी नाना पेठ, कात्रजमध्ये सभा

UPSC Interview Tips: UPSC मुलाखतीत काय विचारले जाते? जाणून घ्या बोर्डचे प्रश्न आणि सोपे टिप्स

Venezuelan oil India deal: अमेरिकेची मोठी खेळी! भारताला व्हेनेझुएलाचं तेल मिळणार, पण पैसे कोणाच्या खात्यात जाणार? धक्कादायक अट समोर

Latest Marathi News Live Update : पुणेकरांना मोफत मेट्रो, बसचं आश्वासन, राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT