Arvind kejriwal  Sakal
देश

Delhi Liquor Scam : घोटाळ्याचा फास अधिक घट्ट; आता केजरीवालांच्या PA ला समन्स

या प्रकरणात दिल्लीचे उपमुखमंत्री मनीष सिसोदिया यांनीही अटकेची भीती व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Delhi Liquor Scam : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या खासगी पीएला समन्स बजावले आहे.

ईडीच्या आरोपपत्रात केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख केल्याच्या काही आठवड्यांनंतर हे समन्स बजावण्यात आले आहे. याप्रकरणात सत्येंद्र जैन यांचीही चौकशी करण्यात आली असून, या सर्व प्रकरणात सीबीआयहीदेखील तपास करत आहे.

या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात विजय नायर, सरथ रेड्डी, बिनय बाबू, अभिषेक बोनपल्ली आणि अमित अरोरा यांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली आहेत.

याशिवाय उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील या प्रकरणात आरोपी आहेत. ईडीने अद्याप या प्रकरणात सिसोदियांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नाही, परंतु तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सप्टेंबर 2022 च्या अखेरीस ते मागे घेण्यात आले. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात दिल्लीचे उपमुखमंत्री मनीष सिसोदिया यांनीही अटकेची भीती व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT