igi airport theft esakal
देश

हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

Airport Theft: दिल्लीतून एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी चोर फ्लाईट केबिनमध्ये ठेवलेल्या सहप्रवाशांच्या बॅगमधून दागिने चोरायचा आणि ज्वेलरला विकायचा.

Sandip Kapde

Airport Theft

दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) एका व्यक्तीला अटक केली. ज्याने त्याच्या मृत भावाच्या नावावर गेल्या वर्षी 200 हून अधिक फ्लाइट्स बुक केल्या. हा व्यक्ती एक  शातिर चोर होता. तो आपल्या सहप्रवाशांच्या केबिन बॅगेजमधून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पश्चिम दिल्लीतील एका ज्वेलर्सला विकायचा. हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायाचा. या चोरावर कोणाला शंका देखील येत नव्हती.

या शातिर चोराचं नाव आहे. आरोपी राजेश कपूर...या राजेश कपूरने 110 दिवसांत 200 हून अधिक उड्डाण केले. यामध्ये चंदीगड आणि हैदराबादसारख्या शहरांच्या सफारीचा समावेश आहे. तो दिल्लीहून राऊंड ट्रिप फ्लाइट घेऊन ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत होता.

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली पोलिस उपायुक्त, उषा रंगनानी यांनी सांगितले, आरोपी अव्यवस्थित बोर्डिंग प्रक्रियेचा फायदा घेतला असेल आणि ओव्हरहेड बॅगेज डब्यांमधून चोरी करत असेल. प्रवाशांनी जागा घेताच त्याने खुल्या बॅगमधून मौल्यवान वस्तू चोरल्या असतील. एवढेच नाही तर एअरलाइन्स आणि कायद्याच्या अंमलबजावणीला चकमा देण्यासाठी राजेश त्याचा मृत भाऊ ऋषी कपूर यांच्या नावाने तिकीट बुक करत असे. ऋषी यांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले.


असा अडकला जाळ्यात -

यानंतर पोलिसांनी कपूरचा शोध सुरू केला. त्याच्या विरोधात पहिली तक्रार या वर्षी 2 फेब्रुवारी रोजी युनायटेड स्टेट्समधील रहिवासी वरिंदरजीत सिंग यांनी दाखल केली होती, जो एअर इंडियाच्या विमानाने अमृतसर ते दिल्ली प्रवास केला होता, जिथे तो फ्रँकफर्ट, जर्मनीला कनेक्टिंग फ्लाइटमध्ये बसणार होता.

सिंग यांनी पोलिसांना सांगितले की, दिल्लीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतून २० लाखांचे दागिने चोरीला गेले.

दुसरे प्रकरण आहे ११ एप्रीलचे, हैदराबाद ते दिल्ली जात असलेल्या सुधारानी पथुरी यांना युनायटेड स्टेट्स ला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटमध्ये जायचे होते. मात्र दिल्ली पोहचल्यानंतर त्यांच्या बॅगेतून सात लाख रुपयांचे दागिने गायब होते.

तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दिल्ली, अमृतसर आणि हैदराबाद विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली. यावेळी त्यांना संबंधित दोन्ही फ्लाइटमध्ये प्रवास केलेली एक व्यक्ती दिसली.

आरोपी गेस्ट हाऊस चालवायचा-

यानंतर तपास करणाऱ्यांनी तपास सुरू केला आणि राजेशने तिकीट काढण्यासाठी वापरलेला फोन नंबर त्याचा नव्हता असे आढळून आले. पोलिसांनी कपूरचा शोध सुरू केला आणि त्याला पहाडगंज, दिल्ली येथून अटक केली. तो रिकी डिलक्स नावाचे गेस्ट हाऊस चालवत होता आणि चार मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर आपल्या कुटुंबासह राहत होता.

पोलिस आयुक्त रंगनानी म्हणाले की, कपूरच्या चौकशीत या दोन गुन्ह्यांव्यतिरिक्त गेल्या चार महिन्यांत इतर तीन चोरींमध्येही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यातील दोन घटनांमध्ये 62.5 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांची नोंद आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, तर पाचवा गुन्हा हैदराबादमध्ये दाखल करण्यात आला आहे.

पूर्वी करायचा ट्रेनमध्ये चोरी -

यानंतर आरोपीनी पोलिसांना पश्चिम दिल्लीतील रेघरपुरा येथे दुकान चालवणारे ज्वेलर्स शरद जैन यांच्याकडे नेले. जैन कपूर यांच्याकडून एक वर्षाहून अधिक काळ चोरीच्या वस्तू खरेदी करत असल्याचा आरोप आहे. त्याने चोरीचे दागिने वितळवून त्याचा वापर इतर दागिने बनवण्यासाठी केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपूर हे सुमारे २० वर्षांपासून चारी करत आहेत. पूर्वी तो ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT