Delhi air pollution esakal
देश

जगात दिल्लीच सर्वांत प्रदुषित राजधानी! सलग दुसऱ्या वर्षी हवेची गुणवत्ता सर्वांत खराब

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदुषित राजधानी बनली आहे. प्रदुषणाबाबतीत बांग्लादेशची राजधानी ढाका सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर जगातील सर्वांधिक प्रदुषित राजधानी होण्याचा हा मान दिल्लीला सलग दुसऱ्यांदा मिळाला आहे. 2021 मध्ये मध्य तसेच दक्षिण आशियाच्या 15 सर्वांत प्रदुषित शहरांमधील 12 शहरे भारतातीलच होती. आफ्रिकन देश चाडची राजधानी नजामिना तिसऱ्या स्थानावर तर तजाकिस्तानची राजधानी दुशांबे चौथ्या आणि ओमानची राजधानी मस्कट पाचव्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एअर क्वालिटी इंडेक्सच्या मानकांनुसार कोणत्याच देशातील कोणतंच शहर सध्या सुरक्षित उरलं नाहीये. (Delhi pollution)

मध्य तसेच दक्षिण आशियातील शहरे सर्वाधिक प्रदुषित

वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2021 नुसार, गेल्या वर्षी दिल्लीच्या पीएम 2.5 मध्ये 14.6 टक्के वाढ झाली होती. तसेच भारतातील कोणतंच शहर WHO च्या AQI च्या गाईडलाईन्सनुसार नाहीये. हा रिपोर्ट जगातील 117 देशांमधील 6,475 शहरांमधील पीएम 2.5 डाटावर आधारित आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, मध्य तसेच दक्षिण आशियातील काही शहरांमध्ये जगातील सर्वांधिक प्रदुषित हवा आहे. जगातील 50 सर्वांधिक प्रदुषिथ शहरांमधील 46 शहरे ही याच प्रदेशांतील आहेत.

भिवंडी सर्वांत प्रदुषित क्षेत्रीय शहर

मध्य तसेच दक्षिण आशिया क्षेत्रातील देशांमध्ये इराण, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश देखील सामील आहे. राजस्थानमधील भिवंडी सर्वाधिक प्रदुषित क्षेत्रीय शहर आहे. हवा प्रदुषण वाढण्यामध्ये पीएम 2.5 ची भूमिका सर्वांधिक महत्त्वपूर्ण ठरते. हवेत जर याची मात्र अधिक असेल तर अस्थमा, स्ट्रोक, हृदय आणि फुप्फुससंदर्भातील आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आरोग्य तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, पीएम 2.5 मुळे जगभरातील लाखो लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो.

दिल्लीमध्ये प्रदुषणाची समस्या सर्वांत गंभीर

दिल्लीमध्ये प्रदुषणाची समस्या खूपच गंभीर बनली आहे. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये हरियाणा तसेच पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जाते, त्यामुळेही प्रदुषण वाढते. प्रदुषणावर योग्य पद्धतीने उपाय न केल्यामुळे देखील सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर अनेक वेळा ताशेरे ओढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT