Damaged vehicles and emergency response teams at the site of a major accident on the Delhi Mumbai Expressway involving multiple vehicles.

 

esakal

देश

Delhi-Mumbai Expressway Accident : दिल्ली-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर भयानक अपघात ; २५ वाहनं एकमेकांना धडकली, चौघांचा मृत्यू

major Delhi-Mumbai Expressway accident : मृतांमध्ये दोन पोलिसांसह चार जणांचा समावेश, २० जण जखमी झाले आहेत.

Mayur Ratnaparkhe

Multiple Vehicle Collision on Delhi Mumbai Expressway: उत्तर भारतामधील बहुतांश भागात अतिशय दाट धुक्यांचा वाहतुकीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. सोमवारी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एकामागून एक २५ वाहने एकमेकांना धडकली ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे २० जण जखमी झाले.

 सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर हा भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी होती, ज्यामुळे एकामागून एक अंदाजे २५ वाहने एकमेकांना धडकली. ज्यामुळे घडलेल्या अपघातात दोन पोलिसांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि सुमारे २० जण गंभीर जखमी झाले.

दोन ओव्हरलोडेड डंपर एकमेकांना धडकल्याने या अपघाताची सुरुवात झाली. दोन डंपरची टक्कर झाल्यानंतर लगेचच मागून येणाऱ्या पेरूंनी भरलेल्या ट्रकने या वाहनांना धडक दिली. यामुळे तो ट्रक उलटला आणि  मोठ्या प्रमाणात पेरू रस्त्यावर सांडले.  

ज्यामुळे महामार्गर निसरडा झाला परिणामी मागून भरधाव येणाऱ्या वाहनांना आधीच धुक्यामुळे काही दिसत नसताना, त्यात महामार्ग निसरडा झाल्याने ब्रेक लावूनही वाहने मोठ्याप्रमाण घसरून एकेमकांना धडकली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident: मंगरूळ नवघरे येथे काळी पिवळी आणि दुचाकीची भीषण धडक; ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Breaking: लागा तयारीला... BCCI ने जाहीर केली IPL 2026 च्या तारखा; फ्रँचायझींना ई-मेल अन्...

Kolhapur Young Footballers Meet Messi : वानखेडेवर ‘लय भारी’ क्षण; मेस्सीने खेळवले, टिप्स दिल्या आणि कोल्हापूरकरांचा अभिमान वाढवला

Municipal Corporation Election : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT