Expressway esakal
देश

Delhi-Mumbai Expresswayवरून इंदूर-देवास-उज्जैनला जाता येणार

मध्य प्रदेशात 214 पूल, 511 कल्व्हर्ट, 100 छोटे-मोठे अंडरपास आणि 7 टोल नाके बांधले जात आहेत

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टशी इंदूर, उज्जैन हे भाग जोडले जात आहेत. देवास, उज्जैन आणि गरोठ दरम्यान नवीन चौपदरी रस्ता तयार करून इंदूरला दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेशी जोडले जात आहे. त्यामुळे माळवा प्रदेशाचे चित्र बदलणार आहे.

देशातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे दिल्ली-मुंबई 8 लेन हा मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशातून जातो आहे. हा द्रुतगती मार्ग (Expressway) राज्याच्या मंडौसौर (102 किमी), रतलाम (90 किमी) आणि झाबुआ (52 किमी) या तीन जिल्ह्यांतून जाणार आहे. या तीन जिल्ह्यांतील द्रुतगती मार्गाची एकूण लांबी २४५ किमी आहे. 245 किमीमध्ये 106 किमीचा रस्ता तयार असून उर्वरित नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. या एक्स्प्रेस वेची एकूण लांबी 1,350 किमी आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिल्ली-मुंबई हा प्रवास १२ तासांत पूर्ण होणार आहे. यासाठी मध्य प्रदेशात 214 पूल, 511 कल्व्हर्ट, 100 छोटे-मोठे अंडरपास आणि 7 टोल नाके बांधले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टशी इंदूर, उज्जैन हे भाग जोडले जात आहेत. देवास, उज्जैन आणि गरोठ दरम्यान नवीन चौपदरी रस्ता तयार करून इंदूरला दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेशी जोडले जात आहे. त्यामुळे माळवा प्रदेशाचे चित्र बदलणार आहे.

expressway

इंदूरपासून गरोठ पर्यंत १७३ किमी चौपदरी रस्ता

राऊ-देवास बायपास मार्गे इंदूर गरोठ येथील दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC) शी जोडले जाणार आहे. यासाठी इंदूर ते गरोठ असा एकूण १७३ किमीचा चौपदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे अंदाजे मूल्य 1890 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे जंक्शन मंदसौर जिल्ह्यातील गरोथ येथे बांधले जात आहे. गरोठ आणि जावरा येथे लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे. बसईजवळील उद्योग केंद्र उभारले जाणार आहेत.

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग वडोदरा येथून मध्य प्रदेशातील मेघनगर जवळ अनस नदीजवळून राज्यात प्रवेश करेल. त्यानंतर ते थांदला, सैलाना, खेजडिया, शामगढ, गरोठ, भवानी मंडी, कोटा मार्गे दिल्लीला पोहोचेल. पहिल्या टप्प्यात दिल्ली ते मुंबई या आठ पदरी महामार्गाचे काम सुरू आहे. भविष्यात दुसऱ्या टप्प्यात वाहतूक वाढल्याने त्याचे 12 लेनमध्ये रूपांतर केले जाईल. या हायस्पीड कॉरिडॉरच्या आसपास लॉजिस्टिक पार्क, औद्योगिक युनिट, कृषी उत्पादन केंद्र आणि अन्न प्रक्रिया युनिट उभारले जाणार आहेत.

Nitin Gadkari

150 KM च्या वेगाने धावतील गाड्या

सप्टेंबर २०२१ मध्ये रतलाममध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या एक्स्प्रेसची पाहणी केली. तेव्हा ते म्हणाले होते की रतलाम हे दिल्ली-मुंबई मार्गावरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित केले जाईल. या महामार्गावर त्यांनी ताशी 150 किमी वेगाने कारही चालवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT