Delhi Crime esakal
देश

Delhi Crime: श्रद्धा खून प्रकरणात नवा खुलासा; बद्री नावाची 'ती' व्यक्ती कोण?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः काल दिवसभर देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणामध्ये नवीन खुलासा समोर आलेला आहे. डेटिंग अॅपवरुन मारेकरी आफताब याने बदी या नावाच्या मुलीला रुमवर बोलावल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे आफताबने मृतदेहाचे केलेले तुकडे फ्रिजमधून कपाटातदेखील ठेवले होते.

आफताब अमीन पुनावाला नावाच्या तरुणाने श्रद्धाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. दोघेही कॉल सेंटरमध्ये काम करत होते. तिने जेव्हा लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. तेव्हा त्याने तिला मुंबईत आणलं, तिचा खून केला. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन दिल्ली परिसरात फेकून दिले. मृतदेहाचे तुकडे साठवण्यासाठी त्याने फ्रिजदेखील खरेदी केल्याची माहिती समोर येतेय. घटनेच्या सहा महिन्यानंतर हा प्रकार काल उघडकीस आलेला आहे.

पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी ८ नोव्हेंबर रोजी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिल्लीतल्या महरौली ठाण्यात दिली होती. आरोपी आफताब अमीन पुनावाला याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचाः Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

दरम्यान, या प्रकरणामध्ये बद्री नावाच्या एका मुलीचं नाव पुढे येत आहे. आफताब तिला डेट करत असल्याचं सांगण्यात येतंय. त्याने तिला त्याच रुमवर बोलावलं होतं, ज्या रुममध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. या प्रकरणात बद्रीचा संबंध कसा? याचा तपास पोलिस करीत आहेत.

'गुगल'वरुन घ्यायचा माहिती

आफताबने श्रद्धाचा खून थंड डोक्याने केल्याचं समजत आहे. त्याने गुगल सर्च करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात माहिती घेतली होती. हत्या केल्याचं समजू नये यासाठी त्याने आणखी काय-काय केलं याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT