Mission Malamal esakal
देश

Mission Malamal : श्रीमंत होण्यासाठी मायलेकीची हत्या; चुलतभावांच्या कृत्याचा पोलिसांकडून पर्दाफाश

सकाळ डिजिटल टीम

Delhi Double Murder Case : 'मिशन मालामाल' नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन आई आणि तिच्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार दिल्लीमध्ये घडला आहे. दिल्लीत्या कृष्णा नगरमध्ये ही घटना घडली होती. या सगळ्या प्रकाराचा पोलिसांनी छडा लावला आहे.

६४ वर्षांची राजरानी नावाची एक महिला आणि तिची मुलगी गिन्नी हिची हत्या पैशांसाठी करण्यात आली. पोलिसांनी दोन चुलत भावांना ताब्यात घेतलं. आरोपींमध्ये किशन (वय २८) आणि त्याचा चुलत भाऊ अंकित कुमार सिंह (वय २५) यांचा समावेश आहे. दोघेही बिहारच्या सीवान जिल्ह्यातील आहेत. सध्या किशन हा लक्ष्मी नगरमध्ये राहात होता. अंकित हा सिंगर आहे.

पोलिसांनी सांगितलं की, मृत राजरानी आणि त्यांची मुलगी गिन्नी किरार यांचं मृतदेह ३१ मे रोजी कृष्णा नगरमध्ये आढळला होता. आरोपींना गुन्हा करण्याआधी कायदेशीर बाजू पडताळली होती. यासाठी त्यांनी दोन वकिलांशी संपर्कही केला होता. खुनाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. आरोपीला सर्वात शेवटी घरामध्ये घुसताना पोलिसांनी बघितलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा किशनला समजलं की पोलिसांना मृतदेह सापडले आहेत. तेव्हा त्याने पलायन केलं. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन दिल्लीतल्या कांटी नगर भागात त्याला पकडलं. तो एका मेडिकल फर्ममध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत असल्याचं तपासून पुढे आलं. त्याने ऑनलाईन ट्युटर सेवा देणाऱ्या एका वेबसाईटवर नोंदणी केली होती.

त्यामुळे त्याचा राजरानी यांच्याशी संपर्क आला. राजरानी यांना त्यांच्या दिव्यांग मुलीसाठी ट्युटरची आवश्यकता होती. किशनने गिन्नीला शिकवण्यासाठी एप्रिलपासून राजरानी यांच्या घरी जायला सुरुवात केली होती. त्यातूनच पुढे विश्वास संपादन केला आणि एक दिवस पैशांसाठी दोघींचा काटा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT