लसीकरण Esakal
देश

लसीकरणाचा मोदी घेणार आढावा

महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ४० पेक्षा जास्त जिल्ह्यांत कमी लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्र, झारखंडसह काही राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण अपेक्षित प्रमाणात झालेले नसल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (३ नोव्हेंबर) कमी लसीकरण असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतील. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा देखील बैठकीत सहभाग असेल.

जी-२० राष्ट्रप्रमुखांच्या संमेलनासाठी परदेश दौऱ्यावर असलेले मोदी मायदेशी परतल्यानंतर ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेतील. यामध्ये प्रामुख्याने ५० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेले आणि दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या ४० हून अधिक जिल्ह्यांचा समावेश आहे. हे जिल्हे महाराष्ट्रासह झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय तसेच इतर राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत ९.८० कोटी जणांचे लसीकरण झाले असून मागील २४ तासांत ४.३० लाख जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरण झालेल्यांपैकी १८ ते ४४ या वयोगटातील ३.६५ कोटी जण पहिला डोस घेणारे आहेत. तर १.१९ कोटी जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत १०६.१४ कोटी डोस देण्यात आले असून मागील २४ तासात ६८.०४ लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहे. देशातील विद्यमान कोरोनामुक्ती दर ९८.२० टक्के असून आतापर्यंत कोरोनापासून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३,३६,५५,८४२ एवढी आहे. तर, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १,५९,२७२ एवढी आहे. ही मागील साडेआठ महिन्यातील आतापर्यंत सर्वात कमी रुग्ण संख्या असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. अर्थात, गेल्या २४ तासांत, १२८३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने ऐन सणासुदीच्या काळात सरकारची धास्ती वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर लसीकरणावर सरकारने भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT