delhi nurse found corona positive struggling to meet two kids 
देश

एका नर्स मातेचा मुलांसाठी तुटतोय अक्षरशः जीव...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर डॉक्टर, नर्स रुग्णांची अहोरात्र काळजी घेताना दिसत आहेत. पण, वैद्यकीय कर्मचाऱयांनाही कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. एका नर्स आईला कोरोनाची लागण झाली असून, मुलांना जवळ घेण्यासाठी त्यांचा जीव अक्षरशः तुटत आहे.

दिल्ली राज्य कर्करोग संस्था (डीएससीआय) येथे काम करणार्‍य नर्सची ही कहाणी आहे. या रुग्णालयातील 22 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाची लागण झालेल्या या नर्सच्या चार वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. पण, त्यांना मुलाला जवळ घेऊन शुभेच्छा देता येत नव्हत्या. व्हिडिओ कॉलिंगवरूच त्यांनी मुलाशी संपर्क साधून शुभेच्छा दिल्या.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नर्सने सांगितले की, आम्ही केरळचे रहिवाशी आहोत. गेल्या महिन्यात सासूची प्रकृती खालावल्यामुळे पतीला केरळला जावे लागले. यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे त्यांना परत येता आले नाही. शिवाय, मुलांची काळजी घेणारी मोलकरणीने काम बंद केले आहे. यामुळे माझ्या दोन्ही मुलांना मित्राच्या घरी ठेवले आहे. मला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना भेटू शकत नाही. फक्त व्हिडीओ कॉलवरूनच त्यांच्याशी संपर्क साधते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT