Delhi Ordinance row Delhi CM Arvind Kejriwal along Raghav Chadha visit Sharad Pawar in his New Delhi residence eSakal
देश

Sharad Pawar News: केजरीवाल शरद पवारांच्या भेटीला! केंद्राच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मोर्चेबांधणी?

रोहित कणसे

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची काल मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता केंद्र लवकरच हा अध्यादेश सभागृहात मांडणार आहे. आम आदमी पार्टी (आप) या विधेयकाला सभागृहात विरोध करणार असून 'आप'ला या प्रकरणात विरोधी पक्षांचाही पाठिंबा आहे. यादरम्यान का अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटर वर अरविंद केजरीवाल आणि राखव चड्ढा यांचा फोटो शेअर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्र अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी माझ्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सौजन्य भेट घेतली, असे पवार म्हणाले आहेत.

केंद्रा सरकारने १९ मे रोजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी एक अध्यादेश जारी केला. या अध्यादेशात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा ११ मेचा निर्णय रद्द केला, ज्यामध्ये दिल्ली सरकारला बदली-पोस्टिंगचा अधिकार मिळाला होता. केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार उपराज्यपालांना दिले होते.

याविरोधात दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी १७ जुलै रोजी सांगितले की, आम्ही हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवू इच्छितो. मग घटनापीठ ठरवेल की केंद्र अशी सुधारणा करू शकते की नाही? असे म्हटले होते.

दरम्यान राज्यसभेत आम आदमी पक्षासह विरोधी पक्ष विधेयकाला विरोध करणार आहे. विधेयक मंजूर होऊ नये याच्यासाठी राज्यसभेत विधेयकाला विरोध करावा यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली होती.

दिल्ली सरकार विरोधातील अध्यादेशाला केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर लवकरच हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. या पार्श्वभूमिवर अरविंद केजरीवाल शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT