Shraddha Walker Case Delhi  esakal
देश

Delhi Police : श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबविरुद्ध पोलिसांना मोठं यश; महत्वाचा पुरावा हाती

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Shraddha Walker Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Walker Murder Case) दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालंय.

या प्रकरणातील आरोपी आफताबचा ऑडिओ (Audio Clip) दिल्ली पोलिसांना मिळालाय. या ऑडिओमध्ये आफताब श्रद्धासोबत भांडत असून या दोघांत मोठा वाद सुरुय. अशा स्थितीत आफताब श्रद्धावर अत्याचार करत होता, याचा अंदाज लावता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलीस (Delhi Police) या ऑडिओला मोठा पुरावा मानत आहेत. या ऑडिओमुळं हत्येचा हेतू स्पष्ट होईल, असं तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यासोबतच, या ऑडिओशी आफताबचा आवाज जुळण्यासाठी दिल्ली पोलीस आफताबच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत. सीबीआयची सीएफएसएल टीम सोमवारी आफताबच्या आवाजाचा नमुना घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आफताब पूनावालावर (Aftab Poonawala) श्रद्धाच्या हत्येचा आरोप आहे. 12 नोव्हेंबरला दिल्ली पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली त्याला दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात अटक केली होती. आफताबनं श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. नंतर ते तुकडे अनेक दिवस घरी फ्रीजमध्ये ठेवले. 18 मे 2022 रोजी संध्याकाळी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची आफताबनं गळा आवळून हत्या केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT