Delhi court blast सकाळ डिजिटल टीम
देश

Delhi court blast: आरोपी ‘त्या’ गोळीबारापासून होता प्रेरित; दिल्ली पोलिसांचा आरोपपत्रात दावा

आरोपीने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारण्यासाठी रिमोट ट्रिगर वापरून जाणूनबुजून आयईडी ठेवला,असे आरोपपत्रात म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीतील रोहिणी कोर्टात कोर्टरूम नंबर १०२ मध्ये ९ डिसेंबर २०२१ रोजी बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. या याप्रकरणी ४७ वर्षीय डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भूषण कटारिया या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या डीआरडीओ शास्त्रज्ञाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.या आरोपपत्रात गेल्या सप्टेंबरमध्ये रोहिणी कोर्टरूममध्ये झालेल्या गोळीबारातून हा डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रेरित होता असे म्हटले. (The Delhi Police Special Cell has filed a chargesheet against DRDO scientist arrested in rohini bomb blast in last December)

आरोपपत्रात म्हटले आहे की गेल्या सप्टेंबरमध्ये रोहिणी कोर्टरूममध्ये झालेल्या गोळीबारात तीन गुंड मारले गेले होते.या घटनेतुन प्रेरीत होऊन आरोपी डीआरडीओने हा कट रचला होता. आरोपी डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भारतभूषण कटारिया यांना त्याचा शेजारी अमित वशिष्ठचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे हा बॉम्बस्फोट करण्याचा कट रचला गेला.

आमच्याकडे आरोपी शास्त्रज्ञाविरोधात पुरावे आहेत आणि एफएसएल (FSL) अहवालाच्या आधारे आरोपपत्र दाखल करतील, असा दावा सोमवारी पोलिसांनी केलाय. आरोपीने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारण्यासाठी रिमोट ट्रिगर वापरून जाणूनबुजून आयईडी (IED) ठेवला,असे आरोपपत्रात म्हटले आहे.

भूषण कटारिया हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून सेवेत होते. बिल्डिंगमध्ये शेजारी राहणाऱ्या वकिलाशी त्याचं भांडण होतं. त्यातूनच त्याने शेजाऱ्याचा काटा काढण्याचा प्लान बनवला. त्यानुसार कोर्टरूममध्ये वकिलाच्या वेशात तो पोहचला. तिथे बॉम्ब प्लांट केलेला टिफीन बॉक्स ठेवून तो बाहेर निघाला. त्यानंतर रिमोट कंट्रोलच्या साह्याने त्याने स्फोट घडवून आणला, असे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT