BOMB ANI
देश

दिल्लीत बॉम्ब तर पंजाबमध्ये RDX सापडल्यानं खळबळ

प्रजासत्ताक दिनापूर्वी सापडलेल्या या बॅगमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनापूर्वी (Republic Day) दिल्लीत बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील गाझीपूर (IED recovery at Ghazipur Flower Market) परिसरातील फ्लॉवर मार्केटमध्ये सापडलेल्या बेवारस बॅग आढळून आल्यानंतर भाजी मंडईजवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी एक्सप्लोजिव्ह कायद्याअंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Delhi Police Special Cell under provisions of the Explosive Act)

घटनास्थळी स्पेशल सेल आणि स्थानिक पोलीस

बेवारस बॅगची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि स्थानिक पोलिसांसह बॉम्बशोधक पथक (Bomb Squad Team) आणि एनएसजीची (NSG Team) टीमही घटनास्थळी जाखल झाली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे.

पीसीआर कॉलवर माहिती मिळाली

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सकाळी 10.50 वाजता एका पीसीआर कॉलवर गाझीपूर फूल मंडीजवळ बॉम्ब असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर खबरदारी म्हणून बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

पंजामध्ये सापडले मोठ्या प्रमाणात RDX

दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील अमृतसरमध्ये 4-5 किलो आरडीएक्स सापडले आहे. यानंतर स्पेशल टास्क फोर्सने परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील गुरुदासपूरमध्येही आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी, डिसेंबरमध्येच लुधियाना येथील न्यायालय संकुलात स्फोट झाल्याची घटना घडली होती. पंजाबमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स सापडल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT