Delhi Cold Wave  eSakal
देश

Delhi Cold Wave : दिल्लीमध्ये थंडीची भीषण लाट; 3.6 अंश सेल्सिअस एवढं कमी झालं तापमान! रेड अलर्ट जारी

राजधानी दिल्लीसोबतच शेजारील राज्यांमध्ये देखील थंडीची लाट दिसत आहे. यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे.

Sudesh

Delhi Records Lowest Minimum Temperature : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. दिल्लीमध्ये शनिवारी या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. आज दिल्लीतील पारा तब्बल 3.6 अंश सेल्सिअस एवढा कमी झाला होता. यामुळे दिल्लीतील दैनंदिन जीवन आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर देखील परिणाम झाला.

राजधानी दिल्लीसोबतच शेजारील राज्यांमध्ये देखील थंडीची लाट दिसत आहे. यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारसाठी याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली. (Delhi Weather Update)

पुढील 3-4 दिवस गंभीर

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, थंडीची ही लाट पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार आहे. 16 जानेवारीनंतर तापमानात काही बदल होऊ शकतो. पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि दिल्लीमध्ये पुढील काही दिवस दाट धुकं राहणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

रेल्वे-विमानसेवा विस्कळीत

अशा हवामानामुळे उत्तरेकडील कित्येक राज्यांमधील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. कित्येक रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत, तर कित्येक फ्लाईट्स रद्द करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT