Anil Deshmukh 
देश

अनिल देशमुखांनी घेतली दिल्लीत सिंघवींची भेट; सुप्रीम कोर्टात जाण्याबाबत खलबतं?

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे थेट दिल्लीत पोहोचले असून या ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये परमबीरसिंग प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याबाबत सल्लामसलत झाल्याचं सांगण्यात येत आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, अनिल देशमुख हे अभिषेक मनु सिंघवी यांच्या निवासस्थानी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान पोहोचले. त्यानंतर या दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली आणि १० वाजण्याच्या सुमारास देशमुख आपल्या कारमधून निघून गेले. यावेळी आणखी पाच ते सहा वकील या ठिकाणी उपस्थित होते. या भेटीचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही. मात्र, सोमवारी मुंबई हायकोर्टानं परमबीरसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याबाबत मार्गदर्शन घेण्याबाबत ही भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने याप्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी सुरु असताना पदावर राहणे नैतिकदृष्या योग्य नसल्यामुळे अनिल देशमुख यांनी पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवल्याचं सांगण्यात येतं आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्यानंतर गृहमंत्रीपद तूर्तास मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Darshan: भीमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा; भाविकांच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर, दर्शनासाठी येणार असाल तर ही बातमी वाचा!

Powai Lake: मुंबईकरांची धडधड वाढली! तलावातून 7 फूट मगर बाहेर आली; नागरिकांची धावपळ, वन विभागाने अनर्थ टाळला

Latest Marathi News Update : मिसिंग लिंकवर दरड कोसळली, दरड आम्ही आणली नव्हती : बावनकुळे

Ajinkya Rahane: 'वर्ल्ड कपचा हिरो अन् संघाबाहेर?' संजू सॅमसनच्या निवडीवर रहाणेचा थेट सवाल; BCCI ला सुनावलं?

Ethanol Petrol Issues : पावसाळ्यात तुमचीही दुचाकी अचानक बंद पडतेय? पेट्रोलमधील 'या' गोष्टीमुळे वाढली वाहनचालकांची डोकेदुखी; कशी घ्यावी खबरदारी?

SCROLL FOR NEXT