Arvind Kejriwal PM Narendra Modi sakal
देश

Delhi : अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात; मोदी सरकारनं केली 'ही' मागणी

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील अधिकाऱ्यांवर कोणाचं नियंत्रण राहणार हे सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं असलं, तरी केंद्र आणि दिल्ली सरकारमधील वाद अद्याप संपलेला नाहीये.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारनं 11 मेच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

त्यामुळं केंद्र सरकारचा दिल्ली सरकारसोबतचा वाद पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. यापूर्वी घटनात्मक खंडपीठानं दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगचे अधिकार दिल्ली सरकारला दिले होते.

वास्तविक, केंद्र सरकारनं शुक्रवारी 'DANICS' संवर्गातील 'गट-अ' अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी 'राष्ट्रीय राजधानी लोकसेवा प्राधिकरण' (Legislative and Executive Power Over Services) स्थापन करण्याच्या उद्देशानं अध्यादेश जारी केला होता.

विशेष म्हणजे, अध्यादेश जारी होण्याच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय राजधानीतील पोलीस, कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर सर्व सेवांचे नियंत्रण दिल्ली सरकारकडे सोपवले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी आदल्या दिवशी आरोप केला होता की, केंद्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मागे घेण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा विचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण 100 टक्के भरले! धरणातून 1,050 क्युसेक विसर्ग सुरू; कृष्णा-कोयना नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचं आवाहन

Sangamner Ganeshotsav: गणेशोत्सवात लेझर, प्लाझ्माला ‘नो एंट्री’! जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश; धनिप्रदूषणमुक्त उत्सव होणार

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय ६० की ६२? सात राज्यांसाठी नियम बदलणार, नेमका काय आहे आदेश?

Marathi News Live Updates: टीव्ही सेंटरमधील प्यासा वाईन शॉपखालील अवैध दारू अड्डा उद्ध्वस्त; मद्यपींसह मालक ताब्यात

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! 10 दिवसांपासून सोनं स्वस्त; आज मुंबई-पुण्यात किती आहे भाव?

SCROLL FOR NEXT